Presidential polls : विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधी, शरद पवारांसह अखिलेश यादवांची उपस्थिती

| Updated on: Jun 27, 2022 | 1:12 PM

विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे आव्हान असणार आहे.

Presidential polls : विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधी, शरद पवारांसह अखिलेश यादवांची उपस्थिती
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कँग्रेस नेते राहुल गांधी, (Rahul Gandhi) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश यांच्यासह सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांची उपस्थिती होती. यशवंत सिन्हा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रावादी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विरोधकांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात भाजपाने द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सिन्हा यांना द्रौपदी मुर्मू यांचे आव्हान

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आज आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत कँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांची उपस्थिती होती. यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रावादी सपा, डिएमके यांच्यासह जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे भाजपाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी आपला उमेदवारी अर्ज यापू्र्वीच दाखल केला आहे. संख्याबळाचा विचार करता भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

 

कोण आहेत यशवंत सिन्हा?

यशवंत सिन्हा यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1937 मध्ये बिहार राज्यातील पाटनामध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी राज्यशास्त्र या विषयात मास्टर डिग्री घेतली. त्यानंतर ते शिक्षक म्हणून रुजू झाले. मात्र त्यांना प्रशासकीय सेवेत येण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. 1960 मध्ये त्यांना यश आले, त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. त्यांनी तब्बल 24 वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात देखील त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. मात्र अनेक कारणांमुळे त्यांचे आणि पक्षश्रेष्ंठींचे वारंवार खटके उडू लागल्याने यशवंत सिन्हा यांनी अखेर 2018 मध्ये भाजप सोडले. त्यांना आता विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.