दिसेल तिथं ठोकणारच, तुला भर चौकात…रुपाली पाटील प्रचंड संतापल्या, सुशील कुलकर्णींना थेट इशारा!
ही पोस्ट करताना पाटील ठोंबरे यांनी एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्य सुशील कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवल्याचे दिसतेय. या स्टेटसमध्ये 'प्रवास थांबतोय. निघालो माघारी. सगळ्यांना शुभेच्छा' असे लिहिलेले दिसतेय.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी काही ऑडिओ क्लीप बाहेर काढल्या. या ऑडिओ क्लीपमध्ये मनोज जरांगे यांचा जनाधार संपवण्याबाबत तसेच 500 कोटी रुपयांचा उल्लेख आहे. या क्लीपमधील आवाज हा भाजपा नेत्यांचा आहे, असा दावा शिंदे गटाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे या ऑडिओ क्लीपचा भाजपाशी काहीच संबंध नाही, असं भाजपाने स्पष्ट केलंय. जरांगे यांनी समोर आणलेल्या अशाच एका ऑडिओ क्लीपमधील आवाज हा सुशील कुलकर्णी यांचा असल्याचा खळबळजनक दावा केला जातोय. ते एक यूट्यूबर आहेत. आता याच यूट्यूबर सुशील कलकर्णी यांना रुपाली ठोंबरे यांनी थेट इशाराच दिलाय. तू एकदम नीच नीघाला. दिसेल तिथे ठोकणारच, असा सज्जड दमच ठोंबरे यांनी दिलाय.
जिथे दिसेल तिथे ठोकणार
रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजबवर एक पोस्ट केली आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी सुशील कुलकर्णी यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. अतिशय तिखट शब्दांत त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. सुशील जिथे दिसतील तिथे मी त्यांना टोकणार असा थेट इशारा त्यांनी दिलाय. “सुशील बापूसाहेब रेणापूरकर उर्फ कुलकर्णी यांनी राजकारणाचा चिखल केलाय राव. पळतोस कुठे हिशोब अपूर्ण राहिलाय..तुला भर चौकात रणरागिणींचा प्रसाद दिल्याशिवाय सुट्टी नाही,” असा सज्जड दमच त्यांनी दिलाय. सोबतच तू तर एकदम नीच निघाला..दिसेल तिथे तुला ठोकणारच…नीच माणूस, असा थेट इशाराच ठोंबरे यांनी दिलाय.
- rupali patil thombre
प्रवास थांबतोय, निघालो माघारी
ही पोस्ट करताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्य सुशील कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवल्याचे दिसतेय. या स्टेटसमध्ये ‘प्रवास थांबतोय. निघालो माघारी. सगळ्यांना शुभेच्छा’ असे लिहिलेले दिसतेय. सुशील कुलकर्णी यांचेच हे स्टेटस असल्याचे म्हटले जातेय. याच स्टेटसचा आधार घेऊन रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुशील कुलकर्णी यांना इशारा दिलाय. त्यामुळे आता आगामी काही दिवसात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासाठीच्या षडयंत्रकारी बैठकीत मी नव्हतो, असे स्पष्टीकरण सुशील कुलकर्णी यांनी दिलेले आहे.