सतीश सावंत भाजपच्या संपर्कात, नितेश राणेंचा दावा, सावंत म्हणतात तुम्हालाच कंटाळून शिवबंधन बांधलं

| Updated on: Dec 12, 2021 | 12:02 PM

सतीश सावंत यांचा प्रस्ताव प्रसाद लाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठेवला. सतीश सावंत हे जिल्हा बँक निवडणुकीनंतर लगेचच जिंकणाऱ्या उमेदवारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असा नितेश राणेंचा दावा आहे.

सतीश सावंत भाजपच्या संपर्कात, नितेश राणेंचा दावा, सावंत म्हणतात तुम्हालाच कंटाळून शिवबंधन बांधलं
Satish Sawant, Nitesh Rane
Follow us on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Bank Election) निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवसेना नेते सतिश सावंत (Satish Sawant) पुन्हा आमनेसामने आले आहेत. सतीश सावंत हे भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यामार्फत भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

फडणवीस-राणेंकडे सावंतांचा प्रस्ताव

सतीश सावंत यांचा प्रस्ताव प्रसाद लाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठेवला.
सतीश सावंत हे जिल्हा बँक निवडणुकीनंतर लगेचच जिंकणाऱ्या उमेदवारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असा नितेश राणेंचा दावा आहे.

“नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून आलो”

दरम्यान, सतीश सांवत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शिवसेनेत आलो, असं स्पष्टीकरण सावंत यांनी दिलं. यापुढे जिथे नितेश राणे असतील, त्या पक्षात यापुढे कधीही रहाणार नाही, असा पलटवार सतिश सावंत यांनी केला आहे.

“…म्हणून नारायण राणेंचं राजकीय नुकसान”

भाजप खासदार नारायण राणे यांचं राजकीय नुकसान आणि अवमूल्यन हे नितेश राणेंच्या कार्यपद्धतीमुळेच झाल्याचा गंभीर आरोप देखील सतीश सावंत यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; बहुजनांच्या मुलांकडे दुर्लक्ष, म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

विनायक राऊतांमुळे महाराष्ट्राची मान खाली गेली, नारायण राणेंवरील टीकेला निलेश राणेंचे प्रत्युत्तर

निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच, भाजपला पराभूत करण्यासाठी दोन पावलं मागे येऊ: जितेंद्र आव्हाड