AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; बहुजनांच्या मुलांकडे दुर्लक्ष, म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता  एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.

Video | महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; बहुजनांच्या मुलांकडे दुर्लक्ष, म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला
गोपीचंद पडळकर
| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 10:26 AM
Share

मुंबई :  म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावरून आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता  एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

काय म्हणाले पडळकर?

जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता  एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन पोरांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे ते स्व:चा गेल्या आठवड्यापासून सांगत आहेत. परीक्षेत घोटाळा झाल्याची त्यांना पूर्वकल्पना होती, गृहखाते देखील राष्ट्रवादीकडे आहे, मग असे असतानाही परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी परीक्षा रद्द करण्याची त्यांच्यावर वेळ का आली? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याची काळजी नाही. एक-एक पैसा गोळा करून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. आजच्या या निर्णयामुळे त्यांचा भ्रमनिरास झाल्याची टीका यावेळी पडळकर यांनी केली.

पुण्यातून तिघांना अटक

म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (MHADA Exam) पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांची कारवाई सुरु असून मोठे मासे गळाला लागल्याची माहिती आहे. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपरही फुटणार होता, असा दावा केला जात आहे. सायबर पोलिसांची सतर्कता आणि एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. रविवारी तिन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या 

विनायक राऊतांमुळे महाराष्ट्राची मान खाली गेली, नारायण राणेंवरील टीकेला निलेश राणेंचे प्रत्युत्तर

‘पवारांनी 25 वर्षांपूर्वी सांगितलं ते आम्हाला 2 वर्षांपूर्वी समजलं, राऊतांचा टोला; आता दरेकर म्हणाले, येणारा काळच सांगेल

निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच, भाजपला पराभूत करण्यासाठी दोन पावलं मागे येऊ: जितेंद्र आव्हाड

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत