विनायक राऊतांमुळे महाराष्ट्राची मान खाली गेली, नारायण राणेंवरील टीकेला निलेश राणेंचे प्रत्युत्तर

विनायक राऊतांमुळे महाराष्ट्राची मान खाली गेली, नारायण राणेंवरील टीकेला निलेश राणेंचे प्रत्युत्तर

लोकसभेत इंग्रजीतून उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे अडखळल्याने शिवसेनेने राणे यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांचा तो व्हिडीओ देखील व्हायरल केला होता. मात्र आता या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 12, 2021 | 9:09 AM

रत्नागिरी : लोकसभेत इंग्रजीतून उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे अडखळल्याने शिवसेनेने राणे यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांचा तो व्हिडीओ देखील व्हायरल केला होता. मात्र आता या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्या लोकसभेत केलेल्या एका भाषणाचा दाखला दिला आहे. राऊत लोकसभेत बोलताना अर्धे मराठी, अर्धे हिंदी भाषेत बोलतात. अशा प्रकारे बोलून त्यांनी कोकण आणि महाराष्ट्राची मान खाली घातल्याची टीका राणे यांनी केली आहे.

काय म्हणाले राणे?

पुढे बोलताना राणे म्हणाले की, विनायक राऊत कधी मंत्री तरी झाले आहेत का? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांना कधी मंत्री तरी केले आहे का? लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहातात तेव्हा ते अर्धे मराठी आणि अर्धे हिंदीमधून बोलतात. राऊतांनी कोकण आणि महाराष्ट्राची मान खाली घातली आहे. अशा शद्बात निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण? 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या लोकसभेतल्या व्हायरल झालेल्या व्हीडिओवरुन शिवसेनेने त्यांना ट्रोल केले होते. लोकसभेमध्ये नारायण राणे यांच्यामुळे महाराष्ट्राची मान खाली गेली अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी टीका केली होती. डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी मंत्री नारायण राणे यांच्या खात्यासंदर्भात इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला होता. खरंतर कनिमोझींनी बंद पडलेल्या आणि डबघाईला आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने आणलेल्या योजना उद्योजकांपर्यंत कशा पोहोचवणार असा प्रश्न विचारला, मात्र मंत्री नारायण राणेंना उत्तर व्यवस्थित देता आलं नाही असं म्हणत शिवसैनिकांनी राणेंचा हा व्हिडीओ व्हायरल केला होता. आता  शिवसेनेच्या या टीकेला निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी विनायक राऊत यांच्या लोकसभेतील भाषणाचा दाखला देत, राऊत लोकसभेमध्ये अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी भाषेमधून बोलतात अशी टीका केली आहे.

संबंधित बातम्या 

‘पवारांनी 25 वर्षांपूर्वी सांगितलं ते आम्हाला 2 वर्षांपूर्वी समजलं, राऊतांचा टोला; आता दरेकर म्हणाले, येणारा काळच सांगेल

निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच, भाजपला पराभूत करण्यासाठी दोन पावलं मागे येऊ: जितेंद्र आव्हाड

VIDEO: महापौरांना धमकीचं पत्रं, शंकाकुशंका आणि पडसाद दुसऱ्या दिवशीही!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें