VIDEO: महापौरांना धमकीचं पत्रं, शंकाकुशंका आणि पडसाद दुसऱ्या दिवशीही!

VIDEO: महापौरांना धमकीचं पत्रं, शंकाकुशंका आणि पडसाद दुसऱ्या दिवशीही!
kishori pednekar

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना काल एक धमकावणारं पत्रं आलं. अश्लील भाषेत, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देणारं हे पत्र वाचून दाखवताना मुंबईच्या महापौरांना अश्रू अनावर झाले...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 11, 2021 | 11:04 PM

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना काल एक धमकावणारं पत्रं आलं. अश्लील भाषेत, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देणारं हे पत्र वाचून दाखवताना मुंबईच्या महापौरांना अश्रू अनावर झाले… मात्र आता किशोरी पेडणेकरांनी त्या धमकीच्या पत्रावरुन शंका उपस्थित केलीय…

सध्या राजकीय लोकांच्या विचाराचं अधपतन होतंय, अशाच विचारांचा आधार घेऊन हे पत्र पाठवलेलं असावं, असं पेडणेकर म्हणाल्यात… सध्या शेलारांच्या आक्षेपार्ह विधानामुळं भाजप-सेनेत नवा वाद निर्माण झालाय..मात्र आता विचाराच्या अधपतनाचं वक्तव्य करताना, पेडणेकरांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही..

धमकीच्या पत्रानंतर, किशोरी पेडणेकरांनी आपला जबाब पोलिसांकडे नोंदवलाय…तर गृहमंत्र्यांनी किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा दिलीय…महापौर आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा दिलेली आहे, धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

महापौरांना आलेल्या धमकीवरुन, शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिलीय…बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, महापौरांप्रमाणं सामना करा असा सल्ला पवारांनी इतर महिलांनाही दिलाय. सगळ्या महिला एकत्र आल्या तर तुमच्या नादाला लागणार नाही, असं पवार म्हणाले.

मुंबईच्या प्रथम नागरिकांनाच आलेली धमकी ही चिंताजनक आहे…अजून तरी हा धमकी देणाऱ्याचा शोध लागलेला नाही…मात्र पेडणेकरांनी यामागे राजकीय आधार असल्याची शंका व्यक्त केलीय…त्याचाही शोध पोलीस घेतीलच…

संबंधित बातम्या:

VIDEO: नवाब मलिकांच्या घरी ‘पाहुणे’ येणार का? पाहुण्यांनी मला सांगावं, मीच ईडीमध्ये येईल: मलिक

AIMIM Rally: मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा; ओवेसींचं मुसलमानांना आवाहन

AIMIM Rally: राहुल गांधी मुंबईत येणार आहेत, तेव्हा 144 कलम लावणार का?; ओवेसींचा ठाकरे सरकारला सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें