AIMIM Rally: राहुल गांधी मुंबईत येणार आहेत, तेव्हा 144 कलम लावणार का?; ओवेसींचा ठाकरे सरकारला सवाल

AIMIM Rally: राहुल गांधी मुंबईत येणार आहेत, तेव्हा 144 कलम लावणार का?; ओवेसींचा ठाकरे सरकारला सवाल
asaduddin owaisi

एमआयएमच्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 144 कलम लागू केलं आहे. त्यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 11, 2021 | 10:09 PM

मुंबई: एमआयएमच्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 144 कलम लागू केलं आहे. त्यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आमची रॅली आहे म्हणून 144 कलम लावता. आता काँग्रेस नेते राहुल गांधीही मुंबईत येणार आहेत त्यावेळीही 144 कलम लागू करणार आहात का? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी ठाकरे सरकारला केला.

चांदिवली येथील एका सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. आमची रॅली होणार म्हटल्यावर मुंबईत 144 कलम लागू केलं. आता राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. तेव्हाही 144 कलम लावणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार आहात? असा सवाल करतानाच राहुल गांधी येतील तेव्हा ओमिक्रॉनची चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमिक्रॉनची चर्चा होते, असा हल्ला ओवैसी यांनी चढवला.

शिवसेनेला तिरंग्याचं एवढं वावडं का?

उठता बसता राष्ट्रवादाचा जप करणाऱ्या शिवसेनेला तिरंग्याचं एवढं वावडं का? आम्ही तिरंगा हातात घेणं गुन्हा आहे का? दलित आणि मुस्लिमांनी तिरंगा हातात घेतला तर यांची पोटदुखी वाटते. आता हे सरकार तिरंग्याच्या विरोधात झालं आहे. मुस्लिमांचा विरोध समजू शकतो. एमआयएमचा विरोध समजू शकतो. पण तिरंग्याचा विरोध का? असा सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे सेक्युलर आहेत का?

ते सत्तेत आहेत. तुम्ही कुठे आहात. तुम्ही तर त्यांच्या दरवाज्यावरही नाही. तुमचं काम फक्त यांना जेवण बनविण्यासाठी मदत करण्याचं आहे. तुम्ही बनवलेल्या अन्नावर तेच डल्ला मारत आहेत.हेच लोक तुम्हाला एमआयएमला मतदान करू नका म्हणून सांगत आहेत. एमआयएम मतांची विभागणी करतील अशी भीती तुम्हाला दाखवली जाते. आता तेच जातीयवाद्यांसोबत बसून सत्ता भोगत आहेत, असं सांगतानाच आमच्यामुळे जर मत विभागणी होत असेल तर उद्धव ठाकरे हे धर्मनिरपेक्ष आहे का? असा सवाल त्यांनी केला.

कुठे आहे आरक्षण?

कुठे आहे आरक्षण? तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही. तुम्ही कुणालाही मतदान करावं हा तुमचा हक्क आहे. पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते. पण तुम्ही सर्व विसरला. तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेला भुलतो.

संबंधित बातम्या:

VIDEO: ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का?; नारायण राणे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

Nawab Malik: भाजपच्या पुण्यातील दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या, लवकरच अटक होणार; नवाब मलिकांचा दावा

‘ये तो सिर्फ गुर्राना था, अभी दहाड बाकी है’, खासदार इम्तियाज जलील यांचा मुंबईतून ठाकरे सरकारला इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें