‘माझा भाऊ गेला.. आता ते सत्तेत,’.. सुप्रिया सुळेंच्या त्या विधानांवर सुनेत्रा पवार यांनी सुनावले
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजितदादांच्या विमाना अपघाताबद्दल गंभीर वक्तव्य केले आहे. त्यास आता सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्या विमान अपघात निधनाबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. सत्तेत असणाऱ्या, उपमुख्यमंत्री असणाऱ्या भावाचा अपघात झाला. याबाबत अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत आहे, अजित पवार गटाच्या 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एक शब्दही काढलेला नाही अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्यावर आता उपमुख्यमंत्री सुप्रिया यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिले आहे.
भाऊ अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता पवार कुटुंबात वादळ सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी माझ्या भावाचा विमान अपघातात मृ्त्यू झाला. या प्रकरणात अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला आहे. अजितदादा पवार यांच्या गटाच्या ४० आमदारांनी आणि ९ मंत्र्यांनी कधीही एफआयआर आणि चौकशीवर शब्दही काढलेला नाही. यावर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या म्हणतात की, ‘अजित दादांच्या जाण्याचे दुःख किती आहे हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार ? अजित दादांच्या अपघाताचे राजकारण करू नका अशी टीकाही सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर केली आहे.
दादांच्या जाण्याचे राजकारण कुणीच करू नये
सुनेत्रा पवार यांनी पुढे म्हटलंय की आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे. त्यांना ही आपण वेळ दिला पाहिजे. दादांची आई…दादांची मुले आणि मी यांच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला कळणार ? दादांच्या जाण्याचे राजकारण कुणीच करू नये असे मला वाटते. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का असे मला वाटते. सतत मीडियामध्ये म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही असेही सुनेत्र पवार यांनी म्हटले आहे.