सुनील तटकरे यांना विरोधकांकडून घेरण्याची तयारी, म्हणाले भाजपमध्ये तेच आधी उडी मारतील

सुनील तटकरे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळताच विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. भविष्यात अजित दादांच्या पक्षातून भाजपात उडी घेणारे तेच पहिले नेते असतील असं विरोधकांनी म्हटले आहे.

सुनील तटकरे यांना विरोधकांकडून घेरण्याची तयारी, म्हणाले भाजपमध्ये तेच आधी उडी मारतील
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 10:05 PM

Raigad loksabha election : रायगड लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होताच सुनिल तटकरेंना विरोधकांनी घेरले आहे. भविष्यात अजितदादांकडून भाजपात पहिली उडी मारणारे तटकरेच असतील. असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

2019 ला तटकरेंना 4,86,968 तर शिवसेनेच्या गीतेंना 4,55,530 मतं पडली होती. तटकरेंनी गीतेंचा 31,438 मतांनी पराभव केला होता. मात्र तटकरेंच्या विजयात श्रीवर्धन आणि शेकापचे आमदार असलेल्या जयंत पाटलांच्या अलिबागचा वाटा होता. तटकरेंचा 31,438 मतांनी विजय झाला होता. त्यात श्रीवर्धन तालुक्यानं दिलेलं लीड 37,877 मतांचं होतं.

गेल्यावेळी रायगड लोकसभेची विधानसभानिहाय मतं बघितली तर

  • पेणमधून शिवसेनेच्या गीतेंना 90588, तटकरेंना 89281 मतं… गीतेंना फक्त 1,307 मतांचं लीड होतं
  • महाडमध्ये गीतेंना 81938, तटकरेंना 75113….गीतेंना 6,825 चं लीड…
  • दापोलीत गीतेंना 86266, तटकरेंना 70456……गीतेंना 15,810 मतांचं लीड….
  • गुहागरमधून गीतेंना 63643, तटकरेंना 61364….गीतेंना 2,279 मतांचं लीड…
  • अलिबागमधून गीतेंना 79497, तटकरेंना 99463….तटकरेंना 19,966 चं लीड….
  • श्रीवर्धनमध्ये गीतेंना 51009, तटकरेंना 88886…इथं तटकरेंनी 37,877 लीड घेतलं होतं..
  • गीते 4 ठिकाणी आघाडीवर असले., तरी तो फरक तटकरेंसाठी अलिबाग आणि एकट्या श्रीवर्धनने भरुन काढला होता.

मात्र गेल्यावेळी तटकरेंसोबत गुहागरचे भास्कर जाधव, अलिबागमध्ये शेकापचे जयंत पाटील सोबत होते. अनंत गीतेंसोबत दापोलीचे योगेश कदम, महाडचे भरत गोगावले होते. यावेळी तटकरेंसोबत महायुतीत योगेश कदम तर महाडचे गोगावले आहेत. तर मविआत अनंत गीतेंसोबत भास्कर जाधव आणि शेकापचे जयंत पाटील असणार आहेत. त्यामुळे आता विजय कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. मुंबईला लागून असलेल्‍या रायगड लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. रायगड मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान होणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसघांचा समावेश आहे. प्रशासनाकडून येथे तयारीला सुरुवात झाली आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.