महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी! 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे 10.30 वा. सुनावणीला सुरुवात

| Updated on: Sep 07, 2022 | 8:06 AM

Supreme Court hearing on Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश उदय लळीत हे स्वतः घटनापीठात नसणार आहेत. डी.एम चंद्रचूड आणि हिमा कोहलींनी याप्रकरणा आधाही काम पाहिलं होतं. चंद्रचूड आणि कोहलींना या संपूर्ण प्रकरणाची माहिती असल्यामुळे घटनापीठात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी! 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे 10.30 वा. सुनावणीला सुरुवात
महत्त्वपूर्ण सुनावणी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात सुनावणी (Supreme Court Hearing) होणार आहे. सकाळी 10.30 वाजता ही सुनावणी पार पडेल. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली अन्य चार न्यायाधीश असतील. पाच न्यायाधीशाांच्या घटनापीठापुढे आज सुनावणीत नेमकं काय होतं, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सरन्यायाधीश (CJI) उदय लळीत हे स्वतः घटनापीठात नसणार आहेत. डी.एम चंद्रचूड आणि हिमा कोहलींनी याप्रकरणा आधाही काम पाहिलं होतं. चंद्रचूड आणि कोहलींना या संपूर्ण प्रकरणाची माहिती असल्यामुळे घटनापीठात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कृष्ण मुरारी यांचाही समावेश घटनापीठात आहे. सोबत एम आर शाह आणि नसिमान या दोन न्यायमूर्तींचाही समावेश करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

घटनापीठामध्ये कोणकोणते न्यायमूर्ती?

  • डी. एम. चंद्रचूड
  • एमआर शाह
  • कृष्ण मुरारी
  • हिमा कोहली
  • नरसिम्मन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टात रीट प्रीटीशन दाखल केलं होतं. तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्याची याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं अखेर आजपासून सुनावणी पार पडेल.

वेगवेगळ्या परस्परविरोधी याचिकांमुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा गुंता वाढलाय. आमदारांना अपात्र करण्याची मागणी, विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, राज्यपालांची भूमिका, खरी शिवसेना कुणाची, विधानसभा अध्यक्षांची निवड, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे महाराष्ट्राचा राजकारण ढवळून निघालं आहे. या सगळ्या विषयांवर एकत्रित सुनावणी आता घटनापीठापुढे घेतली जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली असून सध्या राज्यात फडवणीस-शिंदे सरकार काम करतंय. मात्र हे सरकारच बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आला होता. राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं.

या सगळ्या घडामोडीत राज्यातील पालिका निवडणुकांवरही राजकीय घडामोडींची पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. अशात सुप्रीम कोर्टात नेमका महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा किती काळ चालतो, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, खरी शिवसेना नेमकी कुणाची? या प्रश्नांची उत्तर कधीपर्यंत मिळतात, याकडे सगळ्यांची नजर लागलीय.