MLC Election 2022: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची तात्पुरती सुटका करण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.
काँग्रेस वरिष्ठांकडून सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत येण्याची सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. उद्या राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. मात्र सध्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या आजरपणामुळे रुग्णालयात आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.
न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सगळेच दबावाखाली आहेत. आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे सिद्ध होतंय. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी साडेसात तास लावले. मुंबईतून निवडणूक आयोगाशी कोण बोलत होतं, कोया सूचना, माहिती दिली जात होती, हे सगळं आम्हाला माहिती आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
अयोध्येत आम्ही 35 वर्षांपासून येतोय. हनुमानगढीलाही येतोय. कुणी हनुमान चालिसाचं पुस्तक घेऊन आम्हाला राजकारण शिकवू नये. हनुमान गढींच्या विश्वस्तांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केलं आहे, मात्र प्रत्येकाचे वैचारिक मतभेद असतात, ते फार गंभीर नाहीत, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
खासदार राहुल गांधी यांची आजची ईडी चौकशी संपली आहे. दोन टप्प्यात तब्बल साडे आठ तास राहुल गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात होते. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आता ते काँग्रेस मुख्यालयात जाणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 10 जून रोजी महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेनेवर आरोप केले आहे. या निवडणुकीत सर्व आमदारांनी मतदान केले. मात्र आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
रेशन वितरकांना धान्य वितरीत केल्यानंतर जो मोबदला दिला जातो यामध्ये वाढ कऱण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 4 जुलै रोजी तालुका स्तरावर वितरक हे आंदोलन करणार आहेत तर 11 जुलै रोजी जिल्हास्तरावर आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान यावेळी मागण्यांचे निवेदन हे जिल्हा प्रशासनाला दिले जाणार आहे.