AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंचायत’ सीरिजमधील हा अभिनेता ‘रामायण’मध्ये साकारणार कुंभकर्ण

नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'रामायणम' या चित्रपटातील कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉबी देओलची चर्चा होती. परंतु बॉबी नव्हे तर पंचायत सीरिजमधील अभिनेत्याची निवड झाली आहे.

'पंचायत' सीरिजमधील हा अभिनेता 'रामायण'मध्ये साकारणार कुंभकर्ण
रामायण चित्रपटात पंचायत फेम अभिनेत्याची वर्णीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2026 | 9:46 AM
Share

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि साई पल्लवी हे राम आणि सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार कोणकोणत्या भूमिका साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी अभिनेता बॉबी देओलची निवड झाल्याची चर्चा होती. परंतु या चर्चा केवळ अफवाच ठरल्या आहेत. कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी बॉबी देओल नव्हे तर दुसऱ्या एका अभिनेत्याची निवड झाल्याचं कळतंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात आता कुंभकर्णाच्या भूमिकेत ‘पंचायत’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये प्रहलाद चाचाची भूमिका साकारणारा अभिनेता फैजल मलिक दिसणार आहे. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सांगितलं की, त्यांनी मुंबईच्या प्राइम फोकस स्टुडिओमध्ये इंटरनॅशनल ॲक्शन क्रूसोबत कुंभकर्णाच्या इंट्रोडक्शनचा सीन शूट केला आहे. या सीनमध्ये ग्राफिक्सचा भरणा असेल, तर केजीएफ फेम अभिनेता यशसोबत फैजलने हा सीन शूट केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील प्रमुख युद्धाच्या सीन्सची शूटिंग अद्याप बाकी आहे. फैजलची उंची आणि त्याचं भारदस्त व्यक्तिमत्व हे कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचं दिग्दर्शकांचं मत आहे. याच कारणामुळे त्याला कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. परंतु याबाबत रामायण या चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तर फैजलनेही याविषयी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. फैजल मलिक हा उत्तम अभिनेता आहे. पंचायत या वेब सीरिजच्या चारही सिझन्समध्ये त्याने प्रह्लाद चाचाची भूमिका साकारली होती. नुकताच तो अनिल कपूर यांच्या सुभेदार या चित्रपटातही सॉफ्टी भैय्याच्या भूमिकेत झळकला होता.

‘रामायणम्’ असं मूळ नाव असलेल्या या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा श्रीराम यांच्या आणि दाक्षिणात्य अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रामायण’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि साई पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे. यासाठी तो शाकाहारी जेवण जेवतोय आणि दररोजचा त्याचा वर्कआऊट रुटीनसुद्धा बदलला आहे.

Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...