AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायणम्’च्या टीझरमधील या 7 बारकाव्यांकडे तुमचं लक्ष गेलं का?

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणम्' या चित्रपटाचा छोटा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या व्हिडीओमध्ये असे काही बारकावे आहेत, ज्याकडे सहसा तुमचं लक्ष गेलं नसेल, परंतु त्यातून रामायण आणि कथेविषयीचे महत्त्वपूर्ण हिंट्स देण्यात आले आहेत.

'रामायणम्'च्या टीझरमधील या 7 बारकाव्यांकडे तुमचं लक्ष गेलं का?
RAMAYANImage Credit source: Youtube
Updated on: Jul 06, 2025 | 11:59 AM
Share

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाचा इंट्रो व्हिडीओ 3 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘रामायणम्’ असं मूळ नाव असलेल्या या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा श्रीराम यांच्या आणि दाक्षिणात्य अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या भूमिकेची एक छोटीशी झलकसुद्धा या व्हिडीओमध्ये पहायला मिळाली. त्याचसोबत चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. कोणता कलाकार रामायणमधील कोणतं पात्र साकारणार, हे स्पष्ट करण्यात आलं. ‘रामायणम्’च्या या छोट्याशा टीझरने तुफान चर्चा घडवून आणली आहे. परंतु यामध्ये लपलेल्या 7 गोष्टींकडे तुमचं लक्ष गेलंय का?

कबंध राक्षस

‘रामायणम्’च्या या इंट्रो व्हिडीओमद्ये जो टेम्प्लेट दाखवला गेलाय, त्यात अनेक हिंट आणि सीन्सची माहिती मिळते. टेम्प्लेटमधील एका दृश्यात कबंध नावाचा एक डोळा असलेला राक्षस दाखवण्यात आला आहे. तो एक शापित गंधर्व सैनिक होता, जो सीतेच्या शोधात असलेल्या राम-लक्ष्मण यांना दिसतो. तेव्हा श्रीराम त्याला मुक्त करतात.

कुंभकरणाची झलक

टेम्प्लेटमध्ये रावणाचा भाऊ कुंभकरणाचीही एक झलक पहायला मिळते. कुंभकरण सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा असायचा.

राम-रावणातील युद्ध

राम आणि रावण यांच्यात जे युद्ध झालं, त्याचीही झलक या टेम्प्लेटमध्ये दाखवण्यात आली आहे.

हनुमानजींचं रुप

एका सीनमध्ये हनुमानाचंही रुप दाखवलं गेलंय. या चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहे.

सीता स्वयंवर

एका टेम्प्लेंटमध्ये सीता स्वयंवरदरम्यानचं दृश्य दाखवलं गेलंय. ज्यामध्ये श्रीराम हे महादेवांचं धनुष्य तोडतात.

हरिणासोबत सीता

एका सीनमध्ये सीतेला पंचवटीमध्ये हरिणासोबत दाखवलं गेलंय. चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत आहे.

जटायू आणि रावण यांच्यातील युद्ध

याशिवाय जेव्हा रावण सीतेला लंकेच्या दिशेने घेऊन जात असतो, तेव्हा जटायू आणि रावण यांच्यात झालेलं युद्धही एका टेम्प्लेंटमध्ये दाखवण्यात आलं आहे. या युद्धादरम्यान रावण जटायूचे पंख छाटतो.

‘रामायण’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि साई पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे. यासाठी तो शाकाहारी जेवण जेवतोय आणि दररोजचा त्याचा वर्कआऊट रुटीनसुद्धा बदलला आहे.

प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.
मराठीचा अपमान अन् खळ्ळखट्याक! रिक्षा चालकाला चोपला
मराठीचा अपमान अन् खळ्ळखट्याक! रिक्षा चालकाला चोपला.
ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!
ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी.
सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप.
चूक नेमकी कोणाची? त्या शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलण?
चूक नेमकी कोणाची? त्या शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलण?.
VIDEO : शिंदेंच्या आमदारानं अविमुक्तेश्वरानंद महाराजांना शिकवली मराठी
VIDEO : शिंदेंच्या आमदारानं अविमुक्तेश्वरानंद महाराजांना शिकवली मराठी.