AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेला ज्याची भीती तेच घडले, इराणकडून रशिया आणि चीनबद्दल सणसणीत खुलासा, थेट खळबळजनक..

अमेरिका आणि इराण युद्ध टोकाला पोहोचले आहे. यादरम्यानच आता इराणकडून जगाची झोप उडवणारा दावा करण्यात आला. चीन आणि रशिया आपल्याला या युद्धात कशाप्रकारे मदत करत आहेत, हे इराणकडून नुकताच स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेला ज्याची भीती तेच घडले, इराणकडून रशिया आणि चीनबद्दल सणसणीत खुलासा, थेट खळबळजनक..
Iranian Foreign Minister Abbas Araghchi
| Updated on: Mar 16, 2026 | 9:55 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देश संकटात असून मोठा हाहाकार उडाला. यादरम्यानच आता इराणकडून धक्कादायक आणि अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला. इराणकडून मोठा दावा करण्यात आला असून त्यांनी स्पष्ट म्हटले की, या युद्धात आम्हाला रशिया आणि चीनची मदत मिळत आहे. लष्कर मदत या दोन्ही देशांची मिळत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, चीन आणि रशियासोबत इराणची मोठी भागिदारी आहे आणि या संघर्षाच्या काळात ते आमची मदत करत आहेत. पुढे अब्बास यांनी म्हटले की, नेमकी मदत यांची काय मिळत आहे हे मी सांगू शकत नाही.

पण इराणचे या दोन्ही देशांसोबत राजनैतिक, आर्थिक आणि लष्कर संबंध आहेत. इराणकडून करण्यात आलेल्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अगोदरच संशय व्यक्त करण्यात आला होती की, रशिया या युद्धात इराणला मदत करत आहे आणि आता त्यावर इराणकडून भाष्य करण्यात आले आहे. यावेळी बोलताना अब्बास यांनी म्हटले की, सध्याची स्थिती चर्चेची नाही.

इराणकडून अगोदरच स्पष्ट सांगण्यात आले की, इराण युद्ध संपेपर्यंत मागे हटणार नाही. जोपर्यंत परत हल्ला करणार नाही, याचे आवाहन आणि झालेले नुकसान मिळत नाही तोपर्यंत इराण मागे हटणार नाही. पुढे बोलताना अराघची यांनी म्हटले की, या युद्धात आखाती देशांच्या फक्त अमेरिकेन लष्कर तळावर इराण क्षेपणास्त्र टाकत आहे. आखाती देशांवर होणाऱ्या हल्ल्यामागे इस्त्रायल असल्याचेही शंका त्यांनी उपस्थित केली.

यादरम्यान अराघची यांनी मोठा दावा केला की, इराणने शाहिद सारखे लुकास नावाचे ड्रोन तयार केले आहेत. ज्याचा वापर इराणकडून आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळाच्या विरोधात करण्यात आला. त्यांनी यावेळी मोठा इशारा देत म्हटले की, जर तेहरानच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना टार्गेट करून हल्ले करण्यात आले तर याचा खतरनाक बदला इराण घेईल. इराणच्या क्षेत्रात असलेल्या अमेरिकन कंपन्यांवर थेट हल्ला केला जाईल.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले