Devendra Bhuyar | अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण, देवेंद्र भुयारांची मुख्यमंत्र्यांवरील नाराजी कायम

| Updated on: Jun 21, 2022 | 11:05 AM

भुयार म्हणाले, मी पहिल्या दिवशीपासून महाविकास आघाडीसोबत आहे आणि राहणार. पण, शिवसेनेचे काही आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत गद्दारी केली. हे गद्दार कोण आहेत, याचा शोध आता संजय राऊत यांनी घ्यावा.

Devendra Bhuyar | अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण, देवेंद्र भुयारांची मुख्यमंत्र्यांवरील नाराजी कायम
देवेंद्र भुयारांची मुख्यमंत्र्यांवरील नाराजी कायम
Follow us on

अमरावती : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्य आहेत. ते शिवसेना (Shiv Sena) सोडून भाजपात जातील, असं वाटत नाही. खमक्या व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. पण, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. कठोर, निर्भीड मनाता माणूस एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही. ते भाजपसोबत (BJP) जाईल, असं काही मला वाटत नाही. ते कायम महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) राहणार यात तिळमात्र शंका नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, अजित पवार हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याची धुरा सांभाळत आहेत. अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. तर तो माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण असेल, असंही भुयार म्हणाले.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारली

देवेंद्र भुयार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच दीड वर्ष हे आजारपणात गेलं. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आली. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना पाहिजे तसा वेळ देता आला नाही. कोरोना आता मागे पडला. राज्याची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यामुळं येत्या काळात अशी काही परिस्थिती निर्माण होणार नाही. मुख्यमंत्रीसुद्धा वेळ देतील. मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो आहे, अशी माहिती देवेंद्र भुयार यांनी दिली.

सूर्याजी कोण हे संजय राऊतांनी शोधावं

राज्यातील सरकार स्थिर राहील. विधान परिषदेत शिवसेनेची मत फुटली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही मतं फुटली. आता अस्थितील निखारे कोण झाले. हे आता संजय राऊतांनी शोधावं. कोण सूर्याजी झाले, याची चौकशी करावी, असंही ते म्हणाले. भुयार म्हणाले, मी पहिल्या दिवशीपासून महाविकास आघाडीसोबत आहे आणि राहणार. पण, शिवसेनेचे काही आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत गद्दारी केली. हे गद्दार कोण आहेत, याचा शोध आता संजय राऊत यांनी घ्यावा.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस पाठिंबा काढणार नाही

आनंद दिघेंनी धर्मवीर चित्रपटात सांगितलं की, गद्दारांना माफी नाही. त्यामुळं राऊतांनी आता गद्दारांना शोधावं. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला. तरीही काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढणार नाही. कोण राज्यसभेत आणि विधान परिषदेत कोणासोबत गेले. याचा दूध का दूध आणि पाणी का पाणी या निवडणुकीत झाला, असंही भुयार यांनी सांगितलं.