‘माफिया सेनेचे बारा मतं फुटली लवकरच ठाकरे सरकारचेही बारा वाजणार’; किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर निशाणा

विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाने महाविकास आघाडीला धक्का देत आपला पाचवा उमेदवार निवडून आणला. आता यावरून किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. लवकरच ठाकरे सरकारचे बारा वाजणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'माफिया सेनेचे बारा मतं फुटली लवकरच ठाकरे सरकारचेही बारा वाजणार'; किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर निशाणा
किरीट सोमय्या Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 9:16 AM

मुंबई : सोमवारी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल हाती आले. हे निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असे आहेत. महाविकास आघाडीकडील आमदारांचे संख्याबळ पहाता दहा जांगापैकी शिवसेनेचे (Shiv Sena) दोन उमेदवार, राष्ट्रवादीचे (NCP) दोन उमेदवार तर काँग्रेसचे दोन आणि भाजपाचे (BJP) चार उमेदवार विजयी होणे अपेक्षित होते. मात्र भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजपाचा पाचवा उमेदवार विजयी झाला. भाजपाचे प्रसाद लाड हे विजयी झाले. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे महाविकास आघाडीमधील मतभेद टोकाला पोहोचले असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.  शिवसेना ( माफिया सेनेला) 52 मतं मिळाली, त्यांची 12 मतं फुटली. आता लवकरच ठाकरे सरकारचे बारा वाजणार असं ट्विट सोमय्या यांनी केले आहे.

सोमय्या यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?

विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे देखील विजयी झाले आहेत. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला (माफिया सेनेला) 52 मतं मिळाली. त्यांची 12 मतं फुटली. शिवसेनेकडे त्यांचे 55 मते तर 9 समर्थक आमदारांची 9 मते असे एकूण  64 मते होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेला  52 मतं मिळाली. त्यांची एकूण 12 मते फुटली. आता लवकरच ठाकरे सरकारचे बारा वाजणार असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस नेते नसीम खान यांचा इशारा

दरम्यान दुसरीकडे विधानपरिषदेत काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे पहायला मिळत आहेत. अजून काही ठरलं नाही, मात्र काँग्रेसने दिलेला पहिल्या पसंतीचा उमेदवार जर परभूत होत असेल तर वेगळा काहीतरी विचार करायची वेळ आली आहे, असा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व गोंधळात उद्धव ठाकरे सरकार पुढील आव्हानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.