Navneet Rana : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नवनीत राणांचे बॅनर, भाजपच्या मोठ्या नेत्यांचे फोटो; राष्ट्रवादीकडून महागाई विरोधात हनुमान चाळीसाचे वाचन

| Updated on: May 28, 2022 | 9:51 AM

नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार असं चित्र दिसतंय.

Navneet Rana : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नवनीत राणांचे बॅनर, भाजपच्या मोठ्या नेत्यांचे फोटो; राष्ट्रवादीकडून महागाई विरोधात हनुमान चाळीसाचे वाचन
राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नवनीत राणांचे बॅनर
Image Credit source: twitter
Follow us on

नागपूर – आज नागपूरमध्ये (Nagpur) राणा दाम्पत्य विरूध्द राष्ट्रवादी असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण आज राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकाच मंदीरात हनुमान चाळिसाचे (Hanuman chalisa) वाचन करणार असल्याने पोलिसांचा (Nagpur Police) कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि राणा दाम्पत्याला परवानगी दिली आहे. परंतु त्यांना अटी शर्ती देखील घालण्यात आल्या आहेत. अटींचं उल्लंघन केल्याल कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर

नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावलं आहे, त्यामध्ये चंद्रशेख बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत. 25 ते 30 असे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महागाई विरोधात हनुमान चाळीसाचे वाचन

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महागाई विरोधात नागपूरच्या राम मंदीरात हनुमान चाळीसाचे वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे आज पोलिसांनी सकाळपासूनचं पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हनुमान चाळीसा वाचतील त्यानंतर राणा दाम्पत्य आपल्या कार्यकर्त्यांसोबत हनुमान चाळीसाचे वाचन करणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

हे सुद्धा वाचा

राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कसल्याची प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.