नऊ जागा जिंकणे शक्य, तरीही आठच खासदार देत भाजपचा चकवा, राज्यसभेतही एनडीएची ताकद वाढली

| Updated on: Nov 03, 2020 | 3:40 PM

उत्तर प्रदेशातून भाजपचे नऊ खासदार राज्यसभेवर जाणे सहज शक्य होतं, मात्र भाजपने एक जागा सोडून सर्वांनाच चकित केले.

नऊ जागा जिंकणे शक्य, तरीही आठच खासदार देत भाजपचा चकवा, राज्यसभेतही एनडीएची ताकद वाढली
Follow us on

नवी दिल्ली : राज्यसभेतील (Rajyasabha Election) उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सर्व 10 जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल घोषित केले. उत्तर प्रदेशातील आठ जागा खिशात घालत भाजपने (BJP) राज्यसभेत आपली ताकद वाढवली आहे. यासोबतच भाजपने स्वतःचा उच्चांकी, तर काँग्रेसने (Congress) निचांकी आकडा गाठत नवा इतिहास रचला. (Uttar Pradesh BJP Eight Candidate on Rajyasabha elected unopposed)

उत्तर प्रदेशातून भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह, माजी डीजीपी बृजलाल, नीरज शेखर, हरिद्वार दुबे, गीता शाक्य, बीएल शर्मा आणि सीमा द्विवेदी राज्यसभेवर गेले आहेत. समाजवादी पक्षाकडून (सपा) राम गोपाल यादव, तर बहुजन समाजवादी पक्षाकडून (बसप) रामजी गौतम वरिष्ठ सभागृहात पोहचले आहेत.

राज्यसभेवरील 10 खासदारांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. यामध्ये भाजपच्या तीन, समाजवादी पक्षाच्या चार, बसपच्या दोन, कॉंग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. निवडणुकीत उत्तर प्रदेशातून भाजपचे नऊ खासदार राज्यसभेवर जाणे सहज शक्य होतं, मात्र भाजपने एक जागा सोडून देत सर्वांनाच चकित केले.

भाजपचा डावपेच

भाजपने नऊऐवजी आठ जागांवरच उमेदवार दिल्याने सप आणि बसप यांचे प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर पोहोचले. काँग्रेसने भाजपवर आणि सप-बसप यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोपही केला.

उत्तराखंडमधील एकमेव जागाही भाजपच्या खिशात जाण्याची दाट शक्यता आहे. दोन राज्यात मिळून भाजपच्या तीन जागा होत्या. मात्र आता भाजपाला अधिकच्या सहा जागा मिळत आहेत. यूपीमधील अधिकच्या पाच, तर उत्तराखंडमधील एक.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या राज्यसभेवरील 11 जागांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजप वरिष्ठ सदनात शिखरावर पोहोचल्याचे दिसते. तर कॉंग्रेसची अवस्था इतिहासात सर्वात वाईट झाली आहे. आता राज्यसभेत भाजपाच्या एकूण 92 जागा होतील, तर कॉंग्रेसच्या वाट्याला अवघ्या 38 जागा उरल्या आहेत. विरोधीपक्षांच्या जागा 101 वरुन घसरुन 95 वर गेल्या आहेत.

सेना-अकाली दलाच्या एक्झिटनंतर भरपाई

शिवसेना आणि अकाली दल या दोन महत्त्वाच्या मित्रपक्षांनी ‘एनडीए’तून बाहेरचा रस्ता धरल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई भाजपने केली. दोन्ही पक्षांच्या राज्यसभेत प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा जागा होत्या. मात्र भाजपने या निवडणुकीत ही भरपाई केली. एनडीएचे एकूण संख्याबळ 112 इतके राखता आले आहे.

245 सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 123 जागांची आवश्यकता असते. म्हणजेच एनडीए बहुमतापासून केवळ 11 आकडे दूर आहे.

राज्यसभेचे गणित कसे?

राज्यसभेत एकूण 245 जागा आहेत. ज्यात 12 जागांवर राष्ट्रपती नियुक्त खासदारांची निवड होते. तर अन्य जागांसाठी प्रत्येक राज्यातून निवडणुका होतात. (Uttar Pradesh BJP Eight Candidate on Rajyasabha elected unopposed)

लोकसभा खासदारांची निवड थेट मतदारांमधून होते, राज्यसभेचे गणित मात्र काहीसे क्लिष्ट असते. विधानसभेत ज्या पक्षाचे जास्त आमदार तितकेच, राज्यसभेत अधिक खासदार

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत. राज्यसभेच्या सदस्यांची संख्या आहे 31
नियमानुसार 31 अधिक एक = 32
32 भागिले उत्तर प्रदेशातील एकूण विधानसभा आमदार (403)
(32 भागिले 403) = 12. 59
नियमानुसार 12. 59 अधिक एक = 13.59, राउंड फिगर – 13
म्हणजेच राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी 13 आमदार मतदान करणार

संबंधित बातम्या :

शिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत ‘भरपाई’ची संधी

(Uttar Pradesh BJP Eight Candidate on Rajyasabha elected unopposed)