जपानी बाबा वेंगाची 2026 साठीची आजवरची सर्वात खतरनाक भविष्यवाणी, जगावर संकट ओढवणार, या देशात होणार…

जपानी बाबा वेंगा यांनी एक नवी भविष्यवाणी केली आहे. ती 2026 साठी आहे. आता ही भविष्यवाणी नेमकी काय आहे? जाणून घ्या..

जपानी बाबा वेंगाची 2026 साठीची आजवरची सर्वात खतरनाक भविष्यवाणी, जगावर संकट ओढवणार, या देशात होणार...
Baba Venga
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 08, 2025 | 5:35 PM

मानव नेहमीच भविष्य जाणून घेण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी उत्सुक असतो. यापूर्वी अनेक भविष्यवक्त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा आणि नोस्ट्रोडेमस यांसारख्या भविष्यवक्त्यांचे बरेच वर्षांपूर्वी निधन झाले आहे, परंतु आधुनिक काळातही अनेक लोक भविष्य सांगण्याचा दावा करतात. सध्या जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाण्यांची सर्वत्र चर्चा आहे. यामुळे जपानच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जपानी कलाकार रियो तात्सुकी यांचे ‘द फ्यूचर ऑफ आय सॉ’ हे पुस्तक 1999 मध्ये प्रकाशित झाले होते.

कोरोना महामारीपासून फ्रेडी मर्करीच्या मृत्यूपर्यंतच्या भविष्यवाण्या

या पुस्तकात त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. रियो तात्सुकी यांचे चाहते त्यांना फ्रेडी मर्करीचा मृत्यू, ग्रेट हानशिन भूकंप, 2011 चा तोहोकू भूकंप आणि सुनामी तसेच कोरोना महामारीच्या अचूक भविष्यवाण्यांचे श्रेय देतात. यामुळेच तात्सुकी जेव्हा एखाद्या अनपेक्षित घटनेची भविष्यवाणी करतात, तेव्हा लोक त्यांचे गांभीर्याने ऐकतात. रियो तात्सुकी यांनी 5 जुलाई 2025 रोजी जपानमध्ये भीषण त्सुनामी येईल, अशी भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली नाही. याबाबत त्यांच्या वेबसाइटचे व्यवस्थापक लियो म्हणतात, ‘रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाण्या 15 वर्षांच्या चक्रानुसार होतात. म्हणजेच त्यांनी जी भविष्यवाणी केली आहे, ती 15 वर्षे पुढे सरकेल.’

वाचा: या वासाला सापही चळाचळा कापतात, वास येताच पळतात 100 किलोमीटर दूर; पावसाळ्यात तर…

2026 साठी रियो तात्सुकी यांनी काय सांगितले?

त्याचप्रमाणे तात्सुकी यांच्या भविष्यवाण्यांमध्ये नानकाई गर्त भूकंपाचाही समावेश आहे. 1981 च्या उन्हाळ्यात तात्सुकी यांना स्वप्न पडले होते की, नानकाई गर्त भूकंपाची पुढील शक्यता 45 वर्षांनंतर म्हणजेच जून किंवा सप्टेंबर 2026 मध्ये असेल. जपानी मीडियाने लियोच्या मदतीने तात्सुकी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तात्सुकी यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, ‘या वर्षी माउंट फुजीमध्ये मोठा आणि तीव्र स्फोट होण्याची शक्यता आहे. हा स्फोट मी स्वप्नात खूप लांबून पाहिला होता. त्यामुळे यामुळे किती जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले, हे मी सांगू शकत नाही.’

रियो तात्सुकी यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, माझ्याकडे भविष्य पाहण्याची कोणतीही शक्ती नाही. 1996 मधील तोहोकू आपत्तेचे स्वप्न हे अशा प्रकारचे शेवटचे स्वप्न होते. पुढे त्या म्हणाल्या, मला सामान्य स्वप्ने पडतात, पण भविष्यवाणीची स्वप्ने वेगळी असतात, त्यांचे स्पष्टीकरण करणे कठीण आहे.