Special Story | जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक, वाचा तज्ञ काय म्हणतात…

| Updated on: Nov 19, 2021 | 6:30 AM

आयुर्वेदात आपल्या दैनंदिन जीवनाविषयी अनेक टिप्स देण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार जेवणानंतर पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जेवणाच्या फक्त 40 मिनिटे आधी किंवा एक ते दोन तासांनंतर पाणी प्या, असे नेहमीच सांगण्यात येते.

Special Story | जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक, वाचा तज्ञ काय म्हणतात...
आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये पाण्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो अशा वेळी आपण कोणत्या प्रकारचे पाणी प्यायला हवे? कोणते पाणी आपल्या शरीरासाठी योग्य आहे असे विविध प्रश्न अनेकांना उद्भवत असतात. तसे पाहायला गेले तर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, थंड, गरम, कोमट जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे पाणी शक्य तितके प्यायला पाहिजे तसेच इतर अनेक तज्ञ मंडळी आपल्याला सल्ला देतात की सर्वसाधारणपणे रूम टेंपरेचर आधारावर पाणी प्यायला पाहिजे.
Follow us on

मुंबई : आयुर्वेदात आपल्या दैनंदिन जीवनाविषयी अनेक टिप्स देण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार जेवणानंतर पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जेवणाच्या फक्त 40 मिनिटे आधी किंवा एक ते दोन तासांनंतर पाणी प्या, असे नेहमीच सांगण्यात येते. मात्र, बरेच लोक जेवणाच्या वेळी पाणी पितात. जेवणानंतर लगेचच पाणी पिणे पचनक्रियेसाठी हानिकारक आहे. अनेकदा या सवयीमुळे गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात.

जेवणानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमजोर होते. पाण्याचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते. पाण्यामुळे अन्नातील ग्लुकोजचे प्रमाण बदलते. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते. जेवणानंतर घेतलेले पाणी एंजाइम आणि ऍसिडमुळे अन्नाच्या क्रियेत व्यत्यय आणते. या कारणास्तव, जेवणानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. अन्नातील पोषण शोषून घेण्यासाठी शरीराला अर्धा तास लागतो.

या समस्या उद्भवू शकतात

जेवणानंतर पाणी प्यायल्याने गॅस्ट्रिक एनर्जी कमी होते. त्यामुळे पचनक्रिया नीट होत नाही. आणि यामुळे पोटात गॅस, अॅसिडीटी सारखे आजार घर करून जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेवणानंतर अन्नाला पोषक तत्व पचण्यासाठी वेळ द्यावा. ताबडतोब पाणी प्यायल्यास शरीराला पोषण मिळत नाहीत.

खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे जठरासंबंधी रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळून जातात. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषकद्रव्य मिळत नाही. याशिवाय गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते.

दिवसातून किती पाणी पिणे योग्य

तज्ज्ञांच्या मते, निरोगी शरीरासाठी दोन लिटर ते चार लिटर पाणी व्यवस्थित आहे. तज्ज्ञ असेही म्हणतात की, पाणी कमी पिले किंवा जास्त पिले तरी ते आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. मात्र जर आपण दररोज जास्त पाणी पित असाल तर मूत्रपिंडा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवणपूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते.

हे देखील अत्यंत महत्वाचे

बरेचजण सकाळी नाश्त्याच्या अगोदर पाणी पित नाहीत. मात्र, हे चुकीचे आहे. आपण दररोज सकाळी झोपीतून उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिल्ले पाहिजे. यामुळे पचन सुधारते आणि वजन कमी होते. तसेच त्वचेची समस्याही कमी होते. आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तसंचारण सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते. दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Vitamin E : ‘व्हिटॅमिन ई’युक्त ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा, वाचा याबद्दल अधिक!