Chanakya Niti | अभ्यास, प्रवास आणि शेती करताना आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा…

| Updated on: Jun 29, 2021 | 7:55 AM

आचार्य यांच्या गोष्टींचे पालन केल्याने आयुष्यातील बर्‍याच मोठ्या अडचणी टाळता येतील आणि प्रत्येक परिस्थितीला आपण सहज सामोरे जाऊ शकता. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीतील जीवनाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श केला आहे. आचार्य यांनी शिक्षा, प्रवास, तपस्या आणि शेती संदर्भात काही नियमही सांगितले आहेत. | Acharya chanakya gave advise for study, travelling and farming in Chanakya Niti

Chanakya Niti | अभ्यास, प्रवास आणि शेती करताना आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा...
Acharya-Chanakya
Follow us on

मुंबई : जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचे कौशल्य शिकायचे असेल तर तर आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति वाचली पाहिजे. आचार्य यांनी हे पुस्तक शेकडो वर्षांपूर्वी लिहिले आहे, परंतु त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आजच्या काळातही अगदी अचूक आहेत आणि लोकांना योग्य मार्ग दाखवतात
(Acharya chanakya gave advise for study, travelling and farming in Chanakya Niti).

आचार्य यांच्या गोष्टींचे पालन केल्याने आयुष्यातील बर्‍याच मोठ्या अडचणी टाळता येतील आणि प्रत्येक परिस्थितीला आपण सहज सामोरे जाऊ शकता. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीतील जीवनाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श केला आहे. आचार्य यांनी शिक्षा, प्रवास, तपस्या आणि शेती संदर्भात काही नियमही सांगितले आहेत. त्यांच्याबद्दल येथे जाणून घ्या –

1. आचार्य म्हणायचे की जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा दोनजण सोबत असायला हवे. जर दोघे एकत्र अभ्यास करत असतील तर ते सहजपणे कोणतीही समस्या सोडवू शकतात. अशा परिस्थितीत, अनेक कन्फ्युजन आपापसांत बोलून दूर करु शकतात.

2. जेव्हा तुम्ही साधना करता किंवा तपश्चर्या करता तेव्हा ती एकट्याने करा म्हणजे तुम्ही तुमचे मन एकाग्र करु शकाल आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा तुमच्या तपश्चर्येला भंग करु नये. तरच तपश्चर्या यशस्वी होऊ शकतात.

3. जर एखादी कला गाणे किंवा नृत्य अशी सादर करयाची असेल असेल तर किमान तीन किंवा त्याहून अधिक लोक असले पाहिजेत. तरच त्याचा आनंद येतो आणि लोकांना आपली कौशल्ये समजतात.

4. प्रवास नेहमी चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र केला पाहिजे. प्रवासादरम्यान अनेक प्रकारचे धोके असतात. अशा परिस्थितीत समस्या उद्भवल्यास लोक एकमेकांना मदत करु शकतात. एकटा माणूस या परिस्थितीत अडचणीत येऊ शकतो.

5. शेती करणे सोपे काम नाही. कोणीही एकट्याने हे करु शकत नाही. शेतीत एकमेकांचे सहकार्य आवश्यक आहे. म्हणून, शेतीची कामे करताना पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक असावेत.

6. युद्धादरम्यान लोकांची कोणतीही मर्यादा नाही. आपल्या बाजूने जितके लोक असतील तितके युद्ध जिंकणे सोपे होईल. हेच कारण आहे की पूर्वीचे लोक सर्वात मोठ्या सैन्यासह युद्धाला जात असत.

Acharya chanakya gave advise for study, travelling and farming in Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | वाईट काळात खऱ्या मित्राप्रमाणे साथ देतात ‘या’ 4 गोष्टी

Chanakya Niti | स्त्रीचे असे सौंदर्य आणि ज्ञानी व्यक्तीचे असे ज्ञान व्य​र्थ आहे, आचार्य चाणक्य काय सांगतात