Chanakya Niti | स्त्रीचे असे सौंदर्य आणि ज्ञानी व्यक्तीचे असे ज्ञान व्य​र्थ आहे, आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते, स्त्रीचे सौंदर्य हे तिचे सामर्थ्य आहे आणि त्याच्या बळावर ती काहीही साध्य करु शकते. तर एक ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानामुळे सर्वत्र आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त करतो, त्याच प्रकारे श्रीमंत व्यक्ती संपत्तीच्या बळावर मोठ्या संकटांवरही सहज मात करु शकतो.

Chanakya Niti | स्त्रीचे असे सौंदर्य आणि ज्ञानी व्यक्तीचे असे ज्ञान व्य​र्थ आहे, आचार्य चाणक्य काय सांगतात
Chanakya Niti
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 26, 2021 | 8:02 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते, स्त्रीचे सौंदर्य हे तिचे सामर्थ्य आहे आणि त्याच्या बळावर ती काहीही साध्य करु शकते. तर एक ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानामुळे सर्वत्र आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त करतो, त्याच प्रकारे श्रीमंत व्यक्ती संपत्तीच्या बळावर मोठ्या संकटांवरही सहज मात करु शकतो. पण काही विशिष्ट परिस्थितीत चाणक्य यांनी या सर्व गोष्टी निरर्थक मानल्या आहेत. चाणक्य नीति काय म्हणते जाणून घेऊया (Acharya Chanakya Said These Type Of Beauty Of Woman And Knowledge Of A Vise Man Are Useless Under Some Circumstances In Chanakya Niti) –

1. आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्रीचे सौंदर्य निःसंशयपणे तिचे सामर्थ्य आहे. परंतु जेव्हा स्त्री सुसंस्कृत आणि पुण्यवान असेल तेव्हाच त्या सौंदर्याचा अर्थ असतो. सद्गुणांशिवाय सौंदर्य हा एक भ्रम आहे. ती कधीही आपला प्रभाव जास्त काळ टिकवू शकत नाही.

2. त्याचप्रमाणे ज्ञान ते महासागर आहे, जे कितीही मिळवले तरीही कमीच असते. म्हणून, व्यक्तीने नेहमी ज्ञान ग्रहण करत राहिले पाहिजे. परंतु जर आपले ज्ञान एखाद्या लक्ष्याशी संबंधित असेल तर ते फायदेशीर आहे परंतु ज्याचे कोणतेही ध्येय नाही, अशी व्यक्ती कितीही ज्ञानी असली तरीही त्याचे सर्व ज्ञान व्यर्थ मानले जाते. म्हणून, आपले ज्ञान ध्येयाशी जोडा आणि त्याने इतरांचे कल्याण करा.

3. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या उच्च कुटुंबातील व्यक्ती निम्न स्तराचे वर्तन करत असेल तर ती नक्कीच एक दिवस आपल्या कुटुंबाच्या नाशाचं कारण बनतो. कारण एखाद्या व्यक्तीचे आचरण त्याला उच्च आणि निम्न पातळीचे बनवते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपले संस्कार कधीही विसरु नका.

4. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने आपला पैसा चांगल्या कामांसाठी वापरला पाहिजे. शास्त्रात श्रीमंतीचे तीन वर्गात वर्णन केले गेले आहे. प्रथम भोग, दुसरे दान आणि तिसरे नाश. याचा अर्थ असा की जर पैशांचा उपयोग भोग, दान करण्यासाठी केला तर घरात समृद्धी नांदते. परंतु जर या दोन्ही कामांमध्ये पैसे वापरले नसेल तर त्या पैशांचा नाश होणे निश्चित आहे.

Acharya Chanakya Said These Type Of Beauty Of Woman And Knowledge Of A Vise Man Are Useless Under Some Circumstances In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें