Akshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

| Updated on: May 14, 2021 | 1:11 PM

दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीवर अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) साजरी केली जाते. शास्त्रात अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केली जाते.

Akshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व
Akshaya tritiya
Follow us on

मुंबई : दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीवर अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) साजरी केली जाते. शास्त्रात अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केली जाते. तसेच, मान्यता आहे की, या दिवशी कोणतेही विचार न करता कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकतात, कारण या दिवशी केलेले कार्य कधीही क्षीण होत नाही (Akshaya Tritiya 2021 Know The Importance Of This Day And Why It Is Considered As Very Auspicious Day).

यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक दानव्यतिरिक्त सोन्या-चांदीचे दागिने आणि जमीन इत्यादी वस्तू खरेदी करतात. यंदाची अक्षय्य तृतीया आज 14 मे 2021 रोजी साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घडलेल्या अशा काही घटनांविषयी जाणून घ्या, ज्यामुळे हा दिवस अधिक शुभ झाला.

देवी गंगा पृथ्वीवर अवतरली

मान्यता आहे की, जेव्हा भागीरथच्या कठोर तपस्येने प्रसन्न होऊन देवी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरीत झाली होती, त्या दिवशीही अक्षय्य तृतीयेचा दिवस होता. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगा स्नानाचे विशेष महत्त्व आहे.

सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात

मान्यता आहे की, सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाली आणि द्वापरयुगाची समाप्ती आणि कलियुगाची सुरुवातही याच दिवशी झाली. युगांचा आरंभ आणि समाप्तीमुळे याला युगादि तिथी म्हणून देखील ओळखले जाते.

परशुराम जयंती या दिवशी आहे

भगवान भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी सहावा अवतार परशुराम यांना मानले जाते, त्यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला होता. त्यांचा जन्म महर्षि जमदग्नी आणि आई रेणुका यांचा पुत्र म्हणून झाला. परशुराम हे चिरंजीवी असलेल्या त्या सात लोकांपैकी एक आहे. मान्यता आहे की ते अद्यापही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.

वेद व्यासांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली

मान्यता आहे की अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर महर्षि वेद व्यासजी यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये गीता देखील आहे. या दिवशी गीतेचा 18 वा अध्याय पठण करणे शुभ मानले जाते.

सुदामा आणि श्री कृष्णाला भेट

अक्षय्य तृतीयेबद्दल अशीही एक मान्यता आहे की, भगवान कृष्णाचे परम मित्र सुदामा या दिवशी द्वारका येथे पोहोचले होते आणि त्यांनी देवाची भेट घेतली होती आणि त्यांना काही तांदुळ अर्पण केले होते. ज्याला प्रेमभावनेने ग्रहण केल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचे दारिद्र्य दूर केले आणि त्याच्या झोपडीला राजवाडा आणि गावाला सुदामा शहर बनवले. त्या दिवसापासून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाचे महत्त्व वाढले.

म्हणूनच मां लक्ष्मीची पूजा केली जाते

मान्यता आहे की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कुबेरांनी महादेवाची पूजा करुन त्यांना प्रसन्न केले. प्रसन्न जेव्हा महादेवांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपलं आणि आणि संपत्ती परत मिळवण्याचे वरदान मागितले. यानंतर शिवजींनी त्यांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितले.

लक्ष्मी जी या भगवान विष्णूची पत्नी असल्याने नारायणाबरोबर त्यांची पूजा केली जाते. तेव्हापासून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान नारायणाची उपासना करण्याची प्रथा सुरु झाली. दक्षिणेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, त्यात कुबेरासमवेत विष्णू भगवान आणि देवी लक्ष्मी यांचेही चित्र असते.

Akshaya Tritiya 2021 Know The Importance Of This Day And Why It Is Considered As Very Auspicious Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 | आज अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि इतर माहिती

Akshaya Tritiya 2021 | जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त