
Baba Vanga Biggest Predictions for December 2025: राशीचक्रातील 12 राशींपैकी या चार राशींना मेगा लॉटरी लागणार आहे. त्यांचे भाग्य बदलणार आहे. इतके वर्ष त्यांना प्रत्येक बाबातीत मोठी तडजोड करावी लागत होती. मेहनत करूनही त्याला फळ मिळत नव्हतं. पण आता हे दुःखाचे दिवस सुखात पालटणार आहे. सरते वर्ष दुःख, संकटं आणि अडचणीचं गाठोड त्याच्यासोबतच घेऊन जाणार आहे. बाबा वेंगाचं या वर्षांतील सर्वात मोठं भाकीत समोर आलं आहे. त्यात या चार राशींच्या भाळी लक्ष्मी टिळा लावणार आहे.
बाल्कनची नास्त्रेदमस म्हणून बाबा वेंगा ही ओळखली जाते. तिच्या अनेक भविष्यवाण्या व्हायरल झाल्या आहेत. 1996 मध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. ती गुढ भाषेत आणि पद्यरचनेत भाकीतं वर्तवित असल्याचा दावा करण्यात येतो. तिचा मोठा चाहता वर्ग होता. तिने केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यावर ती प्रकाश झोतात आली. जगातील बड्या घडामोडी तिने अगोदरच वर्तवल्याचा तिचे फॉलोअर्स दावा करतात. तिच्या अनेक भविष्यवाण्यांनी जगाला हैराण केले आहे.
या राशींचं नशीब पालटणार
मिथुन: बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना डिसेंबर महिन्यात मोठे सुख, संपत्ती मिळेल. त्यांची थांबलेली, अडकलेली कामे मार्गी लागतील. ते आता त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष देतील. या राशीला परदेशी यात्रेची संधी दिसत आहे. तर यांच्या घरातही आनंदाचा सडा पडेल.
कुंभ: कुंभ राशीच्या लोकांना हा महिना म्हणजे स्वर्ग सुखासारखा असेल. आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती अत्यंत चांगली असेल. तुमच्याकडे पैसा येईल. त्यामुळे काहीतरी खरेदी करण्याचा विचार कराल. घरात आणि बाहेरील वातावरण अनुकूल असेल. प्रत्येक ठिकाणी आनंदी आनंद गडे असे वातावरण तुम्हाला भारावून टाकेल.
कन्या: डिसेंबर महिना हा कन्या राशीच्या लोकांसाठी एकदम जोरदार असेल. शनि देवाची कृपा दृष्टी त्यांच्यावर असेल. त्यांचे अडकलेले काम मार्गी लागेल. आर्थिक समस्या आणि अडचणी दूर होतील. एखादी छोटी पार्टी करण्यास हरकत नाही.
वृषभ: बाबा वेंगाच्या ज्योतिषशास्त्राननुसार, वृषभ राशीच्या लोकांना हे वर्ष कसेही गेले असेल. अथवा अडचणींचा सामना करावा लागला असेल. पण आता परिस्थिती 360 डिग्री बदलणार आहे. तुमच्या सुखाचे वारे वाहतील. वर्षाचा अखेरचा महिना एकदम झोकात जाईल. तुम्हाला आर्थिक सहकार्य मिळेल. सूर्य देवाची कृपा तुमच्यावर असेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. घरी आणि नोकरी, व्यापाराच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील.
Disclaimer: ही माहिती धार्मिक मान्यता आणि भविष्यवाणीवर आधारीत आहे. टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही.