Chanakya Niti : या चार चुका टाळाच, अन्यथा जवळच्या लोकांनाही नको वाटेल तुमची संगत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात काही लोकं असे असतात की त्यांचा सहवास प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. परंतु काही लोकं असेही असतात, त्यांना लोकं नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतात.

Chanakya Niti : या चार चुका टाळाच, अन्यथा जवळच्या लोकांनाही नको वाटेल तुमची संगत
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 7:33 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात, या जगात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. काही लोकांचा सहवास हा आपल्याला नेहमी हवाहवासा वाटतो. परंतु आपल्या आयुष्यात असे देखील काही लोकं येतात, ज्यांना आपण नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो. अशा लोकांपासून आपण कायम दूर राहण्याचा प्रयत्न करतो. या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशा लोकांचा स्वभाव असतो. काही लोकं हे प्रचंड अंहकारी, रागीट आणि आपलंच म्हणणं खरं करण्याच्या प्रवृत्तीचे असतात. अशी लोकं कोणालाच आवडत नाहीत, या उलट काही लोकं हे प्रेमळ असतात, रागावर नियंत्रण ठेवणारे असतात, असे लोकं सर्वांनाच आवडतात. अशा लोकांचा सहवास प्रत्येकाला आवडतो. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

अंहकार टाळा – चाणक्य म्हणतात जे लोकं अंहकारी असतात, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे देखील त्यांचा अहंकार दुखावतो, अशी लोक कोणालाच नको असतात. अशा लोकांपासून प्रत्येक जण लांब राहण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे माणसाने अंहकार टाळावा

Loading...

कटू शब्द – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच काम केलं पाहिजे. कोणालाही बोलताना कधीही कटू शब्दांचा कठोर शब्दांचा वापर करू नये. कारण लोकं कायम आपले शब्द लक्षात ठेवत असतात. जे लोकं कटू बोलतात, ते लोकं कोणालाच नको असतात.

रागावर नियंत्रण ठेवा – चाणक्य म्हणतात राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तो केव्हा आपला घात करेल याचा काही नियम नाही. तसेच रागाच्या भरात घेतलेले कोणतेही निर्णय हे शक्यतो चुकीचेच निघतात. रागीट माणसे या जगात कोणालाच नको असतात.

संयम ठेवा – चाणक्य म्हणतात अनेक लोकांना एक सवय असते, ते म्हणजे ते कधीही संयम ठेवत नाहीत. प्रत्येक ठिकाणी उतावळेपणा दाखवतात. या सवयीमुळे त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, तसेच लोकांचा देखील त्यांच्यावरील विश्वास कमी होतो. त्यामुळे माणसाने कायम संयम ठेवावा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us