Chanakya Niti : या तीन लोकांपासून सावधान, …तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात, ज्यांच्यापासून माणसाने कायम सावध राहावं, थोडीशी सुद्धा चूक तुम्हाला महागात पडू शकते.

Chanakya Niti : या तीन लोकांपासून सावधान, ...तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, चाणक्य काय म्हणतात?
CHANKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 8:37 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या समाजात असे काही लोक असतात, ज्यांच्यापासून माणसाने नेहमी सावध राहणं गरजेचं असतं. तुमची एक चूक देखील तुम्हाला खूप महागात पडू शकते. तुम्ही जर अशा लोकांवर विश्वास ठेवला तर हे लोक तुमचा कधीही विश्वासघात करू शकता. असे लोक तोंडाने खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये कपट दडलेलं असतं. असे लोक स्वत:च्या थोड्याशा फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीचं नुकसान करण्यासाठी मागे -पुढे बघत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींपासून नेहमी सावध रहावं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, असे लोक आपल्या स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीमुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. अशा व्यक्तींवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये, कारण अशा लोकांना उपकारांची जाणीव नसते, ते फक्त आपला स्वार्थ पहात असतात. त्यामुळे अशा लोकांवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

विश्वासघातकी लोकं – चाणक्य म्हणतात या प्रकारचे लोकं स्वार्थी लोकांपेक्षा देखील भयंकर असतात. अशा लोकांमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवता कामा नये, कारण असे लोक संधी मिळताच तुमचा विश्वासघात करतात. असे लोक थोड्याशा फायद्यासाठी देखील तुमची गुप्त माहिती तुमच्या शत्रूला देऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांना कधीही आपल्या खासगी गोष्टी सांगू नये, अशा लोकांपासून कायम धोका असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नेहमी खोटे बोलणारे लोकं – आर्य चाणक्य म्हणतात जे लोक नेहमी खोटे बोलतात, अशा लोकांशी कधीही संगत करू नका, कारण अशा लोकांमुळे समजात तुमची देखील बदनामी होते, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध रहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us