Chanakya Niti : संकट कधीही अचानक येत नाहीत, त्यापूर्वी मिळतात स्पष्ट संकेत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात संकट कधीही अचानक येत नाहीत, संकट येण्यापूर्वी त्याचे काही स्पष्ट असे संकेत मिळतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : संकट कधीही अचानक येत नाहीत, त्यापूर्वी मिळतात स्पष्ट संकेत, चाणक्य काय म्हणतात?
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 7:10 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीवर एखादं मोठं संकट येतं, तेव्हा ते अचानक येत नाही, असं संकट येण्यापूर्वी काही विशिष्ट संकेत त्याला मिळत असतात. हे संकेत ओळखणं महत्त्वाचं असतं, तरच तुम्ही तुमच्यावर संकट येण्यापूर्वी काही उपाय योजना करू शकाल. चाणक्य पुढे म्हणतात आयुष्यात कधी काय होईल याचा कोणताही भरोसा नसतो, त्यामुळे माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे, तसेच संकट काळात कधीही घाबरून जाता कामा नये, जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की ही वेळ देखील निघून जाणार आहे. त्यामुळे खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करणं गरजेचं असतं. जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येत, तेव्हा ते अचानक येत नाही, तर त्यापूर्वी त्याचे काही स्पष्ट असे संकेत मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वाद – चाणक्य म्हणतात एकदा-दोनदा वाद झाले तर ती एक सामान्य गोष्ट आहे. परंतु जर एखाद्या व्यक्तीसोबत तुमचा सातत्याने वाद होत असेल तर मात्र ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. तुम्ही वेळीच सावध झालं पाहिजे, ही एका फार मोठ्या संकटाची चाहूल असते. त्यामुळे संकट येण्यापूर्वीच त्यावर उपाय योजना करणं कधीही हिताचं, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

Loading...

अपयश – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला एखाद्या कामात वारंवार अपयश आलं तर ते देखील एखाद्या मोठ्या संकटाचे स्पष्ट संकेत असू शकतात. अशा वेळी वेळीच सावध होऊन तुम्हाला ज्या गोष्टींमुळे अपयश येत आहे, त्या गोष्टींच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे, ती कारणं समुळ नष्ट केलीच पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

बदललेलं वातावरण – चाणक्य म्हणतात जेव्हा सामान्य परिस्थितीमध्ये तुमच्या आवती भोवतीचं सामाजिक वातावरण बदलू लागतं, तेव्हा समजून जावं की हे एखाद्या मोठ्या संकटाचे संकेत असू शकतात, त्यावर वेळीच उपाय योजना करणं गरजेचं असतं, तरच तुम्हाला यशाची प्राप्ती होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us