Chanakya Niti : खूप लवकर राग येतो? कायम तणावामध्ये असता? मग चाणक्यांचे हे 4 उपाय कराच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात या समाजात असे काही लोक असतात, ज्यांना खूप लवकर राग येतो. असे लोक कायम तणावात असतात. अशा लोकांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आपलं जीवन कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात जेवढ्या व्यक्ती असतात, तेवढ्या प्रवृत्ती असतात. काही लोक हे फार संयमी आणि शांत स्वभावाचे असतात. अशा लोकांचा समाज आदर करतो. त्यांना मान-सन्मान देतो. परंतु काही लोक याच्या उलट असतात. ते प्रचंड रागीट असतात. त्यांना थोड्या -थोड्या गोष्टींवरून देखील लगेच राग येतो. असे लोक संशयी स्वभावाचे असतात. ते कोणावर विश्वास देखील ठेवत नाहीत. तसेच त्यांच्या या गुणांमुळेच ते कायम तणावात देखील राहतात. त्यामुळे ते कधीही आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. अशा लोकांनी आधी आपल्या मनावर नियंत्रण मिळवायला शिकलं पाहिजे, तरच ते आपल्या रागावर नियंत्रण मिळून तणावमुक्त जीवन जगू शकतील असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
लगेच व्यक्त होऊ नका – चाणक्य म्हणतात या समाजात असे काही लोक आहेत. जे कायम तुम्हाला डिवचण्याचं काम करत असतात.परंतु अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. तुम्ही जर त्याच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया दिली तर तुम्ही कायम तणावामध्ये राहाल, त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
भावनावर नियंत्रण ठेवा – चाणक्य म्हणतात जसं आनंद, दु:ख या जशा भावना आहेत, तशीच राग देखील एक भावना आहे. जेव्हा एखाद्या माणसाची एखादी कृती आपल्याला आवडत नाही, तेव्हा आपल्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण होतो. मात्र अशावेळी आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.
द्वेष करू नका – चाणक्य म्हणतात माणसाने कधीही एखाद्या व्यक्तीचा द्वेष करू नये. कारण तुम्ही जेवढा एखाद्या व्यक्तीच्या द्वेष करता, तेव्हा त्याचा सर्वाधिक त्रास हा तुम्हालाच होत असतो. यामुळे तुमच्या मनाची चिडचिड वाढते, तुमच्या मनावरील तणाव वाढतो. त्यामुळे द्वेष करू नये.
भावना संयमाने व्यक्त करा – चाणक्य म्हणतात आनंद, दु:ख, राग, लोभ या सगळ्या भावना आहेत. प्रत्येक माणसाला या भावना असतात. मात्र या भावना संयमाने व्यक्त करायला शिकलं पाहिजे, तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण पाहिजे. एक लक्षात ठेवावं, काळ हा खूप झपाट्याने बदलत असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)