Chanakya Niti : या सवयी आजच सोडा, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही, चाणक्यांनी सांगितला यशाचा राजमार्ग
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाला अशा काही सवयी असतात, ज्या हळुहळु त्याला गरिबीकडे घेऊन जातात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या दैनंदिन जीवनात आजही उपयोगी सिद्ध होतात. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाला अशा काही सवयी असतात, ज्या हळुहळु त्याला गरिबीकडे घेऊ जातात. जर तुम्हाला श्रीमंती हवी असेल, आयुष्यात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला या सवयींचा त्याग हा करावाच लागेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल, अन्यथा गरिबी आयुष्यभर तुमची पाठ सोडणार नाही. या सवयी भविष्यात तुमच्या यशाच्या मार्गातील फार मोठा अडथळा ठरतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या सवयी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय- चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय असते, असे लोक नेहमी गरीबच राहतात. असे लोक त्यांच्या आयुष्यात कधी श्रीमंत होऊ शकत नाहीत. याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे लोक आपल्या गरजेपेक्षा जास्त खातात, अशा लोकांना विविध आजार होण्याची देखील शक्यता असते, अशा लोकांचा त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे माणसाने कधीही आपल्या गरजेपक्षा अधिक खाण्याचा मोह टाळावा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
रागीट व्यक्ती – चाणक्य म्हणतात जे व्यक्ती रागीट असतात, त्यांच्या बोलण्यामध्ये मृदुता नसते, वागण्यात नम्रता नसते, असे व्यक्ती देखील आपल्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. कारण असे लोक कोणालाच नको असतात. मात्र तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश पाहिजे असेल तर मात्र स्वभाव नम्र ठेवा, समोरचा व्यक्ती कोणीही असो त्यांच्याशी गोड बोला. तसेच तुम्ही जे काही बोलणार आहात, ते विचार करून बोला असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
जास्त वेळे झोपणे – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती जास्त वेळ झोपतो, आळशी आहे, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर फक्त तुमच्या शरीराला जेवढी झोपेची गरज आहे, तेवढीच झोप तुम्ही घेतली पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)