Chanakya Niti : आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर या तीन गोष्टी टाळाच, चाणक्यांनी सांगितला सुखी जीवनाचा मंत्र
आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात जर आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. लोभ हेच मानवी जीवनाच्या दु:खा मागचं मुळ कारण असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्य चाणक्य यांचा जन्म इसवी सन पूर्व 375 मध्ये झाल्याचं म्हटलं जातं. चाणक्य हे त्यांच्या काळातील एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या कुट नीतीच्या जोरावर धनानंदा सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांना कौटिल्य देखील म्हटलं जातं. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी दु:खाची काही कारणं सांगितली आहेत, तसेच मानवाने आनंदी जीवन कसं जगावं याबद्दल देखील माहिती दिली आहे. चाणक्य म्हणतात मानवाच्या दु:खा मागचं मुळ कारण हे त्याचा लोभ असतो. आपल्यापेक्षा एखादा व्यक्ती थोडा जरी पुढे गेला, त्याच्याकडे थोडी जरी जास्त संपत्ती असली की लगेच आपण त्याचा मत्सर करू लागतो. याच कारणामुळे आयुष्यभर आपण अस्वस्थ असतो. खरा आनंद आपण गमावून बसतो, त्यामुळे मानसाने कधीही कोणाचा मत्सर, द्वेष करू नये असं चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर काही नियम पाळणं गरजेचं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
नकारात्मक लोकांपासून दूर राहा – चाणक्य म्हणतात या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही, जी तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात समस्या कोणतीही असू द्या, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही त्यामधून सहज बाहेर पूड शकतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा नकारात्मक व्यक्तींपासून आयुष्यात कायम दूर राहा. असे लोकं स्वत: देखील काही करत नाहीत, आणि तुम्हाला देखील काही करू देत नाहीत, त्यामुळे अशा लोकांची संगत टाळावी.
वाईट व्यक्तींची संगत नको – चाणक्य म्हणतात कधीही संगत ही चांगल्या माणसांची असावी, कारण जेव्हा लोखंडाला परीसाचा स्पर्श होतो, तेव्हा त्या लोखंडाचं देखील सोन होतं. असंच काहीसं आयुष्याचं आहे, माणसाला नेहमी चांगल्या लोकांची संगत असावी, वाईट लोकांची संगत टाळावी असा सल्ला चणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
लोभ – चाणक्य म्हणतात आयुष्यामध्ये लोभ ही सर्वात घातक गोष्ट आहे, माणसाला आयुष्यभर लोभ सुटत नाही. माणसाने कितीही पैसा कमावला, कितीही संपत्ती कमावली तरी तो आयुष्यभर पैशांच्या मागेच पळत असतो, त्यामुळे तो आयुष्यातील खरा आनंद हरवून बसतो, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)