Chanakya Niti : या जगात तीन गोष्टी फक्त एकदाच मिळतात, पुन्हा कधीच नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की जगात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात फक्त एकदाच मिळतात. पुन्हा कधीच नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या जगात तीन गोष्टी फक्त एकदाच मिळतात, पुन्हा कधीच नाही
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 9:53 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतात. माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशा अनेक गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही गमावल्या तर त्या तुम्हाला पुन्हा -पुन्हा मिळतील. परंतु अशाही काही मौल्यवान गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही एकदा गमावल्या तर त्या तुम्हाला परत कधीही मिळणार नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींचं महत्त्व तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. अशा गोष्टी तुम्ही जपून ठेवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आई-वडील -चाणक्य म्हणतात मणसाला आई-वडील फक्त आयुष्यात एकदाच भेटतात. त्यांच्यानंतर त्यांची जागा तुमच्या आयुष्यात इतर दुसरा कोणताही मनुष्य कधीच घेऊ शकत नाही. अनेकजण तुमच्यावर प्रेम करतात परंतु त्यामागे प्रत्येकाचा कोणता न कोणता स्वार्थ दडलेला असतो. परंतु आई -वडील या जगात असे असतात, की ते आपल्या मुलांवर निस्वार्थ भावनेनं प्रेम करतात. आपल्या मुलाने खूप प्रगती करावी, पुढे जावं असं त्यांना नेहमी वाटत असतं. ते आपल्या मुलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात आई-वडिलांची जागा इतर कोणताही मनुष्य कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे आई-वडिलांचा आदर करा त्यांना जपा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Loading...

विश्वास – चाणक्य म्हणतात विश्वास ही एक अशी गोष्ट आहे, जी एकदा तुम्ही गमावली तर पुन्हा काहीही करा, ती तुम्ही परत मिळू शकत नाहीत. त्यामुळे कधीही कोणाचा विश्वासघात करू नका. ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला त्याचा विश्वास सार्थ करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

शिक्षणाची संधी – चाणक्य म्हणतात प्रत्येकाला योग्य वयात शिक्षणाची संधी मिळते, परंतु ती जर तुम्ही गमावली, तर मात्र त्यानंतर आयुष्यभर तुम्हाला हवी तशी शिक्षणाची संधी मिळू शकत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us