Chanakya Niti : या तीन लोकांना उपदेश करणं व्यर्थ, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कटुनीती तज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात सल्ला देखील अशाच लोकांना दिला पाहिजे, जे लोक त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करतील. त्यातून बोध घेतील. परंतु समाजात असे काही लोक आहेत, ज्यांना सल्ला देणं म्हणजे पालथ्य घड्यावरचं पाणी असतं.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सल्ला देऊ लागलात, तेव्हा तुमच्या सल्ल्याचं मार्गदर्शनाचं मोल कमी होतं. कारण या जगात असे अलेक लोक असतात, त्यांना तुम्ही कितीही मार्गदर्शन केलं. ते सुधारावेत यासाठी प्रयत्न केलं तर त्याचा काही एक उपयोग होत नाह. उलट त्यांच्यामुळे तुम्ही अडचणीत येतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या कधीही नादी लागू नये, त्यांना कधीही सल्ला देण्याचा प्रयत्न करू नये. अशा लोकांना सल्ला देणं म्हणजे पालथ्या घड्यावरच पाणी असतं. घडा जर सरळ असेल तर तुम्ही टाकलेल्या पाण्यामुळे तो घडा भरले. परंतु जेव्हा घडा पालथा असेल तेव्हा तुम्ही त्याच्यावर कितीही पाणी टाकलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तसंच या लोकांचं असतं. त्यामुळे या लोकांना सल्ला देण्याच्या कधीही भानगडीत पडू नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
मुर्ख लोकांना कधीही सल्ला देऊ नका – चाणक्य म्हणतात कधीही मूर्ख लोकांना सल्ला देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण तुम्ही मुर्ख लोकांना कितीही सल्ला दिला तरी त्याच्या त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाहीत. तुमची मेहनत वाया जाईल, मुर्ख लोकांना सल्ला देऊन काहीही उपयोग होत नसते.
ठाम समज – चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीची एखाद्या गोष्टीबद्दल ठाम समज झालेली असते, अशावेळी त्याची ही समज बदलण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तो कधीही आपले विचार सोडणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. ज्या लोकांना उपदेश करून काहीच फायदा होणार नाही, अशा लोकांना उपदेश करू नका, असं चाणक्य म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)