Chanakya Niti : जीवनातील चुकांमधून शिका हे धडे, आयुष्य होईल अधिक सोपं

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात असा एकही माणूस नाही, जो आपल्या आयुष्यात चुका करत नाही, चुका तर सर्वच करतात, मात्र जो व्यक्ती चुकांमधून धडा घेतो, तो आयुष्यात यशस्वी होतो.

Chanakya Niti : जीवनातील चुकांमधून शिका हे धडे, आयुष्य होईल अधिक सोपं
CHANKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 8:12 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही काळाच्या कसोटीवर उतरतात. माणसाने आयुष्य कसं जगलं पाहिजे, याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या हातून अनेक चुका होतात. परंतु जो माणूस या चुकांमधून योग्य तो बोध घेतो, योग्य धडा घेतो, असा माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. परंतु जो माणूस चूक झाल्यानंतर देखील त्यातून योग्य तो धडा घेत नाही, असा माणूस आपल्या आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे माणसाने जी चूक झाली आहे, त्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे, ती चूक सुधारली पाहिजे तरच तुम्हाला यश मिळेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच या चुकांमधून केवळ बोध घेणं महत्त्वाचं नाही तर त्याचं प्रत्यक्ष कृतीत देखील रूपांतर करता आलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संकट – चाणक्य म्हणतात माणसाने आपल्यावर आलेलं संकट आधीच ओळखायला पाहिजे, आणि त्यानुसार योग्य ते पाऊलं उचलली पाहिजेत. अनेक लोक अशी असतात ते स्वत:ला तर तुमचे मित्र म्हणवतात. तुमच्या तोंडावर तुमच्याशी गोड -गोड बोलतात. मात्र तुमची पाठ फिरताच हे लोक तुमची निंदा करतात. तसेच हे लोक तुमच्याशी वरून कितीही गोड बोलत असले तरी देखील अशा लोकांच्या मनात कायम तुमच्याबद्दल कपट असतं, त्यामुळे असे लोक तुम्हाला ओळखता आले पाहिजेत, अशा लोकांपासून सावध राहण्यातच तुमचं हीत आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कृती – चाणक्य म्हणतात आपली कोणती कृती ही चांगली आहे, किंवा कोणती कृती वाईट आहे. कोणत्या कृतीमुळे आपलं नुकसान होणार आहे, कोणत्या कृतीमुळे आपला फायदा होणार आहे? हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जर तुम्हाला या गोष्टी वेळेत ओळखता आल्या तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की यशस्वी माणूस व्हाल, तुमचं आयुष्य हे खूप सोपे होईल, त्यामुळे प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकावं, असं चाणक्य म्हणतात.

या चुका करू नका – चाणक्य म्हणतात जो माणूस आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतो, जो माणूस आपल्याला आपल्या पायावर उभा करतो. त्या माणसाचा आयुष्यात कधीही अपमान करू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us