Chanakya Niti : सिंहाकडून शिका या तीन गोष्टी, आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या पृथ्वी तलावर अशी एकही गोष्ट नाही जी निरूपयोगी आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही न काही शिकवत असते, माणसाने प्राण्यांकडून देखील काही गुण घेतले पाहिजेत.

Chanakya Niti : सिंहाकडून शिका या तीन गोष्टी, आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, चाणक्य काय सांगतात?
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 7:58 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आयुष्य कसं जगावं? याचं मार्गदर्शन करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात या पृथ्वीवर अशी एकही गोष्ट नाही जी निरूपयोगी आहे. प्रत्येक गोष्टीचा काही न काही तरी उपयोग हा असतोच. माणसाच्या अवती भोवती दररोज अशा अनेक घटना घडत असतात, ज्याच्यामधून माणसाला शिकण्याची संधी असते. प्राणी देखील माणसांना अनेक गोष्टी शिकवतात. माणसाने प्राण्यांकडून देखील काही गुण घेतले पाहिजेत. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. कारण त्याच्याकडे काही असे गुण आहेत, ज्या बळावर त्याची इतर प्राण्यांसोबत तुलना होऊ शकत नाही. त्यामुळेच सिंह हा निर्विवादपणे जंगलाचा राजा असतो. या सिंहाकडून माणसाने देखील काही गुण घेतले, पाहिजेत. असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिकार – सिंह हा जगातील एक शक्तिशाली प्राणी आहे. परंतु तो कधीही आपल्या ताकदीवर गर्व करत नाही. त्याची शिकार करण्याची पद्धत देखील वेगळीच असते. शिकार लहान असो अथवा मोठी तो आपल्या पूर्ण शक्तिनेच शिकारीवर हल्ला करणार. त्यामुळे शिकार पकडण्यात त्याला यश मिळतं. त्याच प्रमाणे माणसाने देखील आपला शत्रू लहान आहे की? मोठा हे न पहाता आपला शत्रू कितीही लहान असला तरी त्याच्यावर आपल्या पूर्ण क्षमतेनेच वार केला पाहिजे, शत्रूला दुसरी संधी मिळता कामा नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सिंहाला जेव्हा -जेव्हा शिकार करायची असते तेव्हा -तेव्हा आधी तो दोन पाऊल मागे सरकतो, याचा अर्थ तो शिकारीला भीतो किंवा तो कमजोर आहे, त्याचा पराभव झाला आहे, असा मुळीच नाही. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने तो आपल्या शिकारीवर हल्ला करतो, त्यावेळी तिथे फक्त त्याचाच विजय होतो. चाणक्य म्हणतात सिंहाप्रमाणेच तुम्हाला देखील परिस्थिती ओळखता आली पाहिजे, दोन पाऊले मागे जाणं म्हणजे पराभव नसतो, त्यातून भरारी घेतली पाहिजे.

समूह – चाणक्य म्हणतात माणूस हा मुळातच समूह करून राहणारा प्राणी आहे, परंतु अनेकदा समूहामध्ये मतभेद होतात, भांडणं होतात, त्याचा फायदा हा तिसरा व्यक्ती घेऊ शकतो. सिंह हा प्रचंड ताकदवान प्राणी असतो, मात्र तो देखील समुहात राहतो, या गोष्टी आपण सिंहाकडून घेतल्या पाहिजेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us