Chanakya Niti : या तीन गोष्टी आयुष्यात कधीच विसरू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात, ज्या कधीही विसरता कामा नये. या गोष्टी तुम्हाला कायम तुमचं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात अशा काही गोष्टी असतात, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही विसरू नका. कारण याच गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देत असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
आई -वडिलांचे कष्ट – चाणक्य म्हणतात आई वडील आपल्या मुलांना वाढवण्यासाठी त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी आयुष्यभर प्रचंड कष्ट करत असतात. माणसाने कधीही आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा विसर पडू देऊ नये. कारण ही एक अशी गोष्ट आहे, जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली तर ही जाणीव तुम्हाला आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनण्यास सतत प्रेरणा देते, त्यामुळे कधीही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा विसर पडू देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
संस्कार – चाणक्य म्हणतात माणूस जन्माला आल्यापासून वयाच्या विविध टप्प्यावर त्याच्यावर वेगवेगळे संस्कार होत असतात. यामध्ये तुमचे आई-वडील आणि गुरुंचा वाटा मोठा असतो. तुमचे आई-वडील आणि गुरू तुमच्यावर जे संस्कार करतात. ते संस्कार कधीही विसरू नका, आयुष्यभर या संस्काराचं जनत करू ठेवा. हीच संस्काराची शिदोरी तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणार आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
संकट काळात धावून आलेला मित्र – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती तुमच्या संकट काळात मदतीसाठी धावून आला आहे, त्याला तुम्ही कधीही विसरू नका, तुम्ही देखील त्याच्या संकट काळात त्याची मदत केली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)