Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, येईल पश्चातापाची वेळ
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या माणसाने जीवन कसं जगावं याचं सार सांगतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात काही गोष्टी या अशा असतात, ज्या कायम गुप्त ठेवण्यातच तुमचं हीत असतं, तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असू द्या, अशा गोष्टी कधीच कोणाला सांगता कामा नये. जर तुम्ही या गोष्टी एखाद्याला सांगितल्या तर त्यामुळे भविष्यात तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे या गोष्टी नेहमी गुप्तच ठेवल्या पाहिजेत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
पगार – चाणक्य म्हणतात तुम्ही किती पैसा कमावतात, तुमचा पगार किती याबद्दल कधीही कोणाला सांगू नका, कारण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. त्यामुळे नेहमी तुम्ही पैसा किती कमवता, तुमची संपत्ती किती आहे. याची महािती तुमचा कितीही जवळचा नातेवाईक असेल मित्र असेल तर त्यालाही सांगू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
कमकुवत बाजू – चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीची कोणती न कोणती कमकुवत बाजी असते. परंतु तीची कधीही चर्चा करू नका. त्याबद्दल कोणालाही सांगू नका. कारण आज जो तुमचा मित्र आहे. तो भविष्यात तुमचा शत्रू देखील होऊ शकतो. त्यावेळी तो तुमच्या या गोष्टींचा फायदा घेऊ शकतो, अशावेळी तुमच्याकडे पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी कोणालाही सांगू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
पती -पत्नीमधील भांडणं -चाणक्य म्हणतात पती-पत्नीमधील भांडणं ही खासगी बाब आहे, त्यामुळे अशा भांडणाची चर्चा कधीही तिसऱ्या व्यक्तीसमोर करू नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)