Chanakya Niti : या तीन जागी कधीच थांबू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : या तीन जागी कधीच थांबू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 11:25 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील माणसाला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात अशा काही जागा असतात, जिथे थांबण्याची चूक कधीही माणसाने करू नये, त्याची फार मोठी किंमत त्याला आपल्या आयुष्यात मोजावी लागू शकते. प्रसंगी त्याचा मृत्यू देखील ओढावू शकतो. त्यामुळे अशा जागेवर थांबण्याची चूक करता कामा नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे?  त्याबद्दल.

जिथे शिक्षण नाही तिथे – चाणक्य म्हणतात जिथे शिक्षण नाही, अशा ठिकाणी माणसाने कधीही वास्तव्य करू नये, जर तुमचं घर अशा ठिकाणी असेल ज्या लोकांना शिक्षणाचं महत्त्वचं माहिती नाही, किंवा तिथे चांगलं शिक्षण दिलं जात नसेल तर अशा वातावरणात तुमच्या मुलांची जडण घडण झाल्यास ते भविष्यात कधीही चांगलं शिक्षण घेऊ शकणार नाहीत. शिक्षण हाच मुळात विकासाचा पाया असतो, त्यामुळे माणसाने कधीही अशा ठिकाणी राहू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दोन व्यक्तींचे भांडणं – चाणक्य म्हणतात जिथे दोन व्यक्तींची भांडणं सुरू आहेत, अशा ठिकाणी माणसाने न थांबण्यातच शहाणपणा आहे. कारण यामुळे प्रसंगी ज्याचा दोष नाही त्याला देखील इजा होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा ठिकाणी कधी थांबवू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

संस्काराचा अभाव – चाणक्य म्हणतात ज्या ठिकाणी संस्काराचा अभाव असेल, संस्कार नसलेल्या लोकांचं वास्तव्य असेल तर अशा ठिकाणी न राहण्यातच शहाणपणा आहे, कारण अशा लोकांच्या संगतीमध्ये तुम्हाला देखील वाईट गोष्टींची सवय लागू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी कधीही राहू नका, संगत ही नेहमी चांगल्या लोकांची असावी, असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us