Chanakya Niti : तुमची परिस्थिती कशीही असू द्या; परंतु आयुष्यात हे तीन काम कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात आयुष्यात परिस्थिती कशीही असू द्या, परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या कधीच करता कामा नये, कारण त्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.

Chanakya Niti : तुमची परिस्थिती कशीही असू द्या; परंतु आयुष्यात हे तीन काम कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 10:08 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात आपण गरीब कुटुंबात जन्माला येतो की, श्रीमंत हे आपल्या हातात नसतं. त्यामुळे तुम्ही जर गरीब कुटुंबात जन्माला आलात तर त्याची लाज बाळगण्याचं काहीही एक कारण नाही. कारण वेळ हा सतत बदलत असतो, रावाला रंक आणि रंकाला राव करण्याची ताकद या वेळेमध्ये आहे. परंतु तुम्हाला वेळेचा उपयोग योग्य प्रकारे करता आला पाहिजे. तुम्ही गरीब कुटुंबात जन्माला आलात, त्यामुळे तुम्ही आयुष्यात फार काही करू शकत नाहीत, हा विचार पहिल्यांदा मनातून काढून टाका, माणसाने एकदा एखादी गोष्टी करायची ठरवली, एकदा पक्का निश्चय केला तर तो आयुष्यात काहीही करू शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. परंतु सोबतच चाणक्य यांनी असा सल्ला देखील दिला आहे, चाणक्य म्हणतात तुमची परिस्थिती कशीही असू द्या, परंतु काही गोष्टी चुका या तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच करू नका, अन्यथा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. चला तर मग जाणून घेऊयात, चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

लाज बाळगू नका – चाणक्य म्हणतात तुम्ही जर गरीब कुटुंबात जन्माला आला तर लाज सोडून द्या, तुम्ही तुमच्या गरीब परिस्थितीची कधीही लाज बाळगू नका, कष्टाची लाज बाळगू नका. कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं. तुम्हाला जे काम मिळेल ते मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने करा, प्रामाणिकपणा आणि मेहनत या दोन गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्हाला तुमची परिस्थिती बदलण्यास कारणीभूत ठरतील, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Loading...

आळस – चाणक्य म्हणतात तुम्ही श्रीमंत असाल अथवा गरीब एक गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच करू नका, ती म्हणजे आळस. आजचं काम उद्यावर कधीच ढकलू नका. जर तुमच्या अंगात आळस असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश कधीही मिळू शकत नाही.

प्रामाणिकपणा – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही झालं तरी चालेल परंतु सत्याची साथ कधीही सोडू नका. कारण सत्य हे शाश्वत आहे. चिरंतर टिकणार आहे. त्यामुळे कधीही कोणाची फसवणूक करू नका, प्रामाणिकपणा हीच तुमची ओळख बनवा, त्यामुळे एक दिवस तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us