Chanakya Niti : अशा घरात कधीच नसते पैशांची कमी, सदैव राहतो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात काही घरात कधीच पैसा टिकत नाही, तर काही घरांमध्ये आयुष्यात कधी पैसा कमी पडत नाही. अशा घरात सदैव सुख, समृद्धी आणि शांती असते. असं का होतं? तर त्यासाठी चाणक्य यांनी काही कारणं सांगितली आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की काही घरं अशी असतात, जिथे कधीही पैसा टिकत नाही. घरात सतत गृहकलह असतो. सुख देखील नसतं. या उलट अशी काही घरं असतात जिथे तुम्हाला सुख, समृद्धी आणि बरकत पहायला मिळते, अशा घरामध्ये कधीही पैशांची कमी नसते. मग असं का होतं? तर त्यासाठी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये काही कारणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात ज्या घरात या गोष्टी पहायला मिळतात, तिथे पैसा टिकतो. त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. अशा घराची भरभराट होते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
पती-पत्नीमध्ये प्रेम जिव्हाळा – चाणक्य म्हणतात ज्या घरात पती-पत्नीमध्ये प्रेम असतं, जिव्हाळा असतो. कधीही भांडणं होत नाहीत. अशा घरात बरकत असते. अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा असते. अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. इथे सुख समृद्धी नांदते. घराची भरभराट होते. मात्र ज्या घरात दररोज पती-पत्नीचे भांडणं होतात, अशा घरात मात्र याच्या उलट परिस्थिती पहायला मिळते. त्यामुळे पती-पत्नीने कधीही भांडणं करू नयेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मूर्ख लोकांचा सन्मान करू नका – चाणक्य म्हणतात जीथे मूर्ख लोकांचा सन्मान होत नाही. अशा घरात सदैव पैसा टिकून राहतो. मात्र ज्या ठिकाणी आपल्या थोड्याशा फायद्यासाठी जेव्हा मूर्ख लोकांचा सन्मान केला जातो, तिथे कधीही पैसा जास्त दिवस टिकत नाही. कारण याचा भविष्यात तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे काहीही झालं तरी मूर्ख लोकांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं असतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
अन्नदान – चाणक्य म्हणतात जे घर सदैव अन्न धान्यांनी भरलेलं असतं, जिथे आलेला पाहुणा कधीच उपाशीपोटी जात नाही. अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. अशा घरात कधीही पैसा कमी पडत नाही. त्यामुळे आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाचा योग्य तो मान-सन्मान केलाच पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)