Chanakya Niti : या चार गोष्टींपेक्षा जगात दुसरं काहीच श्रेष्ठ नाही, चाणक्य म्हणतात आयुष्यभर लक्षात ठेवा
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. जगात कोणत्या गोष्टी श्रेष्ठ आहेत? हे सांगताना चाणक्य म्हणतात या जगात चार अशा गोष्टी आहेत, ज्यांच्यापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. थोडक्यात काय तर चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवाने आपलं आयुष्य कसं जगावं याचं सार सांगितलं आहे. चाणक्य यांच्या मते माणूस हा नेहमी आपल्या कर्तृत्वावरच मोठा होत असतो. तुमचं जसं कर्म असेल तसं तुम्हाला फळ मिळतं. त्यामुळे माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवले पाहिजेत. तसेच चाणक्य पुढे असंही म्हणतात की या जगात चार गोष्टी अशा आहेत, ज्या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तुमचं आयुष्य बदलण्याची, ताकद या गोष्टींमध्ये आहे. या गोष्टींमुळे तुमच्या कर्तृत्वाला अध्यात्माची देखील जोड मिळते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
गायत्री मंत्र – चाणक्य म्हणतात गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा मंत्र आहे. तुमच्या आयुष्याचा उद्धार करण्याची ताकद या मंत्रात आहे. गायत्री मंत्रालाच चारही वेदाचे मुळ मानले जाते. गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने तुमच्यामधील सर्व दोष दूर होतात. तुम्हाला पुण्य मिळतं. जे लोक नियमितपणे गायत्री मंत्राचा जप करतात, त्यांचा उद्धार होतो. त्यांच्या आयुष्यात कसलीही भीती, चिंता उरत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आई- चाणक्य म्हणतात या जगात आईची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आई आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी प्रचंड कष्ट करत असते. आपल्या मुलासाठी संपूर्ण जगाशी भिडण्याची तिच्यात ताकद असते. आईचा आशीर्वाद जर तुमच्यासोबत असेल तर आयुष्यात तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टींची कमी भासणार नाही. त्यामुळे आईची सेवा केलीच पाहिजे, असा सल्ला चाणक्य देतात.
अन्नदान – चाणक्य म्हणतात या जगात सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते म्हणजे अन्नदान आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला सोनं दान केलं आणि दुसरीकडे अन्नदान केलं तर तुम्हाला अन्नदानामुळेच अधिक पुण्य मिळणार आहे. कारण या जगात अन्नदानाला सर्वात श्रेष्ठ दान माण्यात आलं आहे.
एकादशी – चाणक्य म्हणता हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास, उपवास केल्यास भगवान विष्णू यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो. आयुष्यातील सर्व संकट दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)