Chanakya Niti : ही माणसं कायम धोका देणार, चाणक्य म्हणतात…

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात अशी काही माणसं असतात, ज्यांना तुम्ही कितीही जीव लावा शेवटी ते तुम्हाला धोका देणारच.

Chanakya Niti : ही माणसं कायम धोका देणार, चाणक्य म्हणतात...
chanakya niti (
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 7:41 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्यांना तुम्ही कितीही आपलं माना, त्यांना कितीही जीव लावा ते तुम्हाला धोका देणारच त्यामुळे असे लोक तुम्हाला ओळखता आलेच पाहिजेत. अनेकदा असे लोक हे आपल्या जवळचेच असतात. त्यामुळे जो माणूस आपल्याशी गोड बोलतो आहे, अशा प्रत्येक गोड बोलणाऱ्या माणसांवर कधीही विश्वास ठेवू नये. कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याला व्यवस्थित पारखून घेतलं पाहिजे. त्यानंतरच अशा व्यक्तींवर विश्वास ठेवावा. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात मुळातच ज्यांचा स्वभाव हा स्वार्थी असतो. असे लोक तुमच्या कितीही जवळचे असू द्या, ते तुम्हाल धोका देणार म्हणजे देणारच. त्यामुळे स्वार्थी लोकांवर कधीही पूर्ण विश्वास ठेवण्याची किंवा त्यांच्यावर अवलंबून राहण्याची चूक करू नका. अशा लोकांमुळे तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Loading...

गुप्त शत्रू – चाणक्य म्हणतात गुप्त शत्रू हे असे असतात, जे तुम्हाला कधीही कळत नाहीत, ते तुमच्या आसपासच असतात, आणि ते बरोबर तुम्हाला धोका देतात. त्यामुळे अशा लोकांपासून देखील सावध राहिलं पाहिजे. असे लोक आपल्याला ओळखता आलेच पाहिजेत.

विश्वासघातकी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक विश्वासघातकी आहेत, अशा लोकांवर देखील कधीही विश्वास ठेवता कामा नये, अशा लोकांमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. असे लोक तुमचा विश्वासघात करू शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us