Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच

सर्वांनाच अशी इच्छा असते की आपल्यालाही नोकरीत चांगलं यश मिळावं, आपलं प्रमोशन व्हावं, पगारामध्ये वाढ व्हावी. मात्र काहींच्या बाबतीमध्ये या गोष्टी खऱ्या ठरतात, तर अनेकांसाठी या गोष्टी एक स्वप्न बनूनच राहतात. त्यांना नोकरीत अपेक्षित यश मिळत नाही, त्याची कारण चाणक्य यांनी सांगितली आहेत.

Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
cahankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 9:33 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपली देखील नोकरीत चांगली प्रगती व्हावी, प्रमोशन मिळावं, आपला पगार वाढावा. मात्र या गोष्टी काही लोकांच्या बाबतीमध्येच खऱ्या ठरतात. तर असे अनेक लोक असतात त्यांच्या वाट्याला हे सुख येत नाही. त्यामागे नेमकं कारण काय आहे? आणि जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये यश मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मोलाचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

ज्ञान आणि नवीन कौशल्य – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही केवळ हुशार असून चालत नाही तर तुमची नेहमी नवीन कौशल्य आणि नव्या गोष्टी शिकण्याची तयारी हवी. जो व्यक्ती नव्या गोष्टी, त्याच्या कामाच्या क्षेत्रात आलेलं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतो, असा व्यक्ती नोकरीमध्ये वरिष्ठांचा विश्वास संपादन करतो. त्याला नोकरीत चांगलं यश मिळतं, आणि एक दिवस असा येतो की असा व्यक्ती आपल्या नोकरीमध्ये प्रचंड प्रगती करतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिस्त – चाणक्य म्हणतात जर तुमच्या अंगी शिस्त असेल तर आणि तरच तुम्ही नोकरीमध्ये टिकू शकता. जर तुमच्या अंगी शिस्त नसेल तर त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे माणसाकडे शिस्त ही असलीच पाहिजे. ज्याच्याकडे शिस्त आहे, असा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्याच प्रमाणे माणूस हा वक्तशीर असावा असं देखील चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us