Chanakya Niti : मित्र, पत्नी अन् मुलाची खरी परीक्षा कधी होते? पहा चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात कधी-कधी असे प्रसंग येतात, त्यावेळी तुम्हाला तुमचा मित्र, पत्नी आणि मुलगा यांची खरी ओळख पटते.

Chanakya Niti : मित्र, पत्नी अन् मुलाची खरी परीक्षा कधी होते? पहा चाणक्य काय म्हणतात?
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 9:51 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात कधी-कधी माणसाच्या आयुष्यात असे काही कठीण प्रसंग येतात, तेव्हा आपल्यासोबत कोण आहेत? आणि आपल्यावर संकट आलं की आपल्याला सोडून जाणारे लोकं कोण आहेत? याची खरी ओळख पटते. माणसाने नेहमी अशा दोन्ही लोकांना लक्षात ठेवावे, एक जे तुमच्या संकट काळात तुमच्यासोबत होते, आणि दुसरे जे तुमच्यावर संकट आल्यानंतर ते तुमच्यापासून दूर निघून गेले. ज्यांनी तुम्हाला तुमच्या संकट काळात मदत केली अशा लोकांना तुम्ही नेहमी मदत करावी, असा सल्ला देखील चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या कठीण काळात त्याची पत्नी, मित्र आणि मुलगा यांची खरी परीक्षा होत असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पत्नीची परीक्षा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही प्रचंड पैसा कमावता, तुमच्याकडे संपत्ती आहे, घरात सुख समृद्धी आहे, अशा वेळी तर तुमची पत्नी नेहमीच तुमच्यासोबत असेल. परंतु कधीकधी चक्र उलटं देखील फिरतं. समजा तुमच्याकडे जर संपत्ती राहिली नाही, तुम्ही कंगाल झालात तर अशा स्थितीमध्ये सुद्धा तुमच्या पत्नीने तुमची साथ सोडली नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, तुमची साथ दिली, तुमच्यावर विश्वास दाखवला तर अशी पत्नी आपल्या सर्वात कठीण परीक्षेत पास झाली असं समजावं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Loading...

मित्र – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्याकडे खूप पैसे असतात, तेव्हा सर्वच जण तुमचे मित्र असतात. प्रत्येक जण तुमचा आदर-सन्मान करतो. परंतु कधी-कधी असा प्रसंग देखील येतो की तुमच्याकडे पैसे नसतात. तुम्हाला पैशांची गरज लागते. अशावेळी जो मित्र तुमच्या मदतीला धावून येतो, तोच खरा मित्र आहे. जो तुम्हाला तुमच्या संकट काळात मदत करतो, तोच तुमचा खरा मित्र समजावा.

मुलगा -चाणक्य म्हणतात मुलाची खरी ओळख ही म्हातारपणात होते. तुम्ही तरुण असताना तुमच्या मुलाला जेवढं जपलं, जेवढी त्याची काळजी घेतली, तेवढीच काळजी तुमच्या म्हातारपणात जर तुमचा मुलगा घेत असेल तर असा मुलगा हा सर्व परीक्षांमध्ये पास ठरतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us