Feng Shui : फेंग शुईनुसार असा असावा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, आयुष्यात येईल सुख, शांती अन् समृद्धी

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. तुमच्या घराचा दरवाजा कसा असावा? याबद्दल फेंग शुईमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुमच्या घराची रचना ही फेंग शुई शास्त्रानुसार असेल तर अशा घरात कधीही पैशांची अडचण येत नाही. घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

Feng Shui : फेंग शुईनुसार असा असावा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, आयुष्यात येईल सुख, शांती अन् समृद्धी
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 9:47 PM

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे, ज्यामध्ये घरातील ऊर्जेचं संतुलन कशा पद्धतीने साधावं याची माहिती देण्यात आली आहे, सर्वसाधारणपणे घरात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात. एक पॉझिटिव्ह ऊर्जा आणि दुसरी निगेटिव्ह ऊर्जा. अनेकदा आपल्या काही छोट्या -छोट्या चुकांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. अशा स्थितीमध्ये घरातील ऊर्जेचं संतुलन बिघडतं. ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होत असतो. यामुळे तुमच्या घरात अनेक अडचणी येऊ शकतात. जसं की गृहकलह वाढतो, पैसा कितीही कमावला तरी तो हातात टिकत नाही. कोणत्या न कोणत्या कारणांमुळे खर्च होतो. असं होऊ नये, घरात ऊर्जेचं संतुलन टिकावं यासाठी फेंग शुईमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण फेंग शुईनुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

फेंग शुई शास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावा किंवा दक्षिण पूर्व दिसेला असला तरी चालेल. या तीन दिशेला घराचा मुख्य दरवाजा असणं हे शुभ मानलं जातं. तसेच फेंग शुई शास्त्रानुसार नियमीतपणे घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता केली पाहिजे. तसेच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची रचना अशी असावी की जिथून तुमच्या घरात पुरेसा नैसर्गिक सूर्यप्रकाश येईल. फेंग शुई शास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये, यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ विंड चाइम देखील लावू शकतात. त्यामुळे ऊर्जा संतुलन निर्माण होण्यास मदत होते. तसेच घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजुला मनी प्लांट सारख्या वनस्पती देखील तुम्ही ठेवू शकतात.

Loading...

फेगं शुई शास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कधीही अस्वच्छ तसेच तुटलेला नसावा. तसेच मुख्य दरवाजाची सजावट कधीही प्लास्टिकच्या वस्तुंनी करू नये, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीही चप्पल स्टँन्ड नसावं असंही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us