Feng Shui : या पाच चुका टाळाच, अन्यथा तुमच्या घरात सतत निर्माण होत राहील नकारात्मक ऊर्जा, फेंग शुईमध्ये काय म्हटलंय?

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करत असतो, की त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Feng Shui : या पाच चुका टाळाच, अन्यथा तुमच्या घरात सतत निर्माण होत राहील नकारात्मक ऊर्जा, फेंग शुईमध्ये काय म्हटलंय?
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 7:13 PM

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे, फेंग शुई देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन महत्त्वाच्या गोष्टींवरच आधारलेलं एक वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई नुसार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचय होतो. जेव्हा एखाद्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा आपोआप तेथील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. यालाच आपण ऊर्जा संतुलन बिघडलं असं म्हणतो. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, किवा ऊर्जा संतुलन बिघडतं, तेव्हा तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की काहीही कारणं नसताना घरात सारखी भांडणं होतात. कितीही कमावला तरी हातात पैसा टिकत नाही, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, एखादं अचानक मोठं आर्थिक संकट निर्माण होतं. अशा गोष्टी घडू नये, म्हणून फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, आज आपण त्यातीलच काही सोप्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

घरात फुटका आरसा ठेवू नका- फेंग शुईनुसार घरामध्ये कधीही फुटका आरसा असू नये, यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. फुटक्या आरशामध्ये चेहरा पाहाणं फेंग शुईमध्ये अशुभ माण्यात आलं आहे. तसेच ते वास्तुशास्त्रामध्ये देखील अशुभ माण्यात आलं आहे.

Loading...

फोटो – फेंग शुईनुसार घरात कधीही मावळता सूर्य, वाहता झरा, यासोबत हिंस्र प्राण्यांचे आणि युद्धाच्या प्रसंगाचे फोटो नसावेत, याचा परिणाम हा घरातील वातावरणावर होतो.

अवजड सामान – फेंग शुईनुसार घरातील बेडरूममध्ये आणि बेडखाली कधीही अवजड सामान ठेवू नये, कारण यामुळे घरात गृहकलह वाढतो.

अस्वच्छता – फेंग शुई शास्त्रानुसार घर हे नेहमी स्वच्छ असावं, घरात अस्वच्छता असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते.

घराची दिशा – फेंग शुईनुसार घराचा मुख्य दरवाजा हा कधीही दक्षिण दिशेला नसावा, घराचा दरवाजा हा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us