Feng Shui : रात्रीतून नशीब चमकेल, करा फक्त फेंग शुईचे हे तीन उपाय, होईल धनाचा वर्षाव

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे, ज्याप्रमाणे घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे फेंग शुई या चीनी वास्तुशास्त्रामध्ये देखील सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Feng Shui : रात्रीतून नशीब चमकेल, करा फक्त फेंग शुईचे हे तीन उपाय, होईल धनाचा वर्षाव
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 10:12 PM

वास्तुशास्त्रा प्रमाणेच फेंग शुई देखील लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. फेंग शुईमध्ये अशा काही वस्तू सांगण्यात आल्या आहेत. ज्या घरात ठेवणं शुभ मानलं जातं. या वस्तुंमुळे घरात सुख, समृद्धी येते घराची भरभराट होते, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे. फेंग शुई हे एक प्राचीन शास्त्र आहे, ज्याचा उगम हा चीनमध्ये झाला. त्यानंतर हळुहळु फेंग शुईचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला. आज जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये फेंग शुई शास्त्राचा वापर केला जातो. फेंग शुई शास्त्रानुसार एखादा व्यक्ती जर आर्थिक कारणांमुळे त्रस्त असेल, प्रचंड कष्ट करून देखील त्याच्या हातात पैसा टिकत नसेल तर असा व्यक्ती फेंग शुईमध्ये सांगण्यात आलेले तीन छोटे बदल आपल्या घरात करू शकतो. यामुळे घरात सुख, समृद्धी येईल, सोबतच अचानक येणाऱ्या आर्थिक समस्या देखील दूर होतील, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण फेंग शुईमध्ये सांगण्यात आलेल्या या तीन उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा या वस्तू – फेंग शुई शास्त्रानुसार तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा कोणती असेल तर तो म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा. कारण याच दरवाजामधून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढावा यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ मनी प्लांट किंवा झेडे प्लांटचं रोप ठेवू शकता. तसेच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला तुमच्या नावाची गोल्डन नेम प्लेट लावावी असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

पाणी आहे धनाचं प्रतिक – फेंग शुईनुसार पाणी हे धनाचं प्रतिक आहे. त्यामुळे तुमच्या घराच्या उत्तर किंवा दक्षिण दिशेला पाणी असलेली एखादी वस्तू जसं की वॉटर फांउटन किंवा इतरही काही वस्तू तुम्ही ठेवू शकतात. या उपायामुळे तुमच्या घराकडे धन आकर्षित होतं. तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

स्वयंपाक घर – फेंग शुई शास्त्रानुसार तुमच्या स्वयंपाक घरातील गॅस हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे, स्वयंपाक घरात अस्वच्छता नसावी, स्वयंपाक घर स्वच्छ असेल तर अन्न-धान्यामध्ये बरकत प्राप्त होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us