Feng Shui : चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता

फेंग शुईनुसार अशा काही वस्तू आहेत, ज्या दुसऱ्या व्यक्तींना कधीही गिफ्ट देऊ नये, असं म्हटलं आहे. या वस्तू तुम्ही जर गिफ्ट दिल्या तर त्यामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते.

Feng Shui : चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 7:54 PM

फेंग शुई हे देखील एकप्रकारचं वास्तुशास्त्र आहे, ज्याची निर्मिती चीनमध्ये झाली. सुरुवातीला फेंग शुईला फक्त चीनमध्येच मान्यता होती. मात्र त्यानंतर हळुहळु फेंग शुई शास्त्राचा प्रसार होत गेला आज जगातील अनेक देशांमध्ये फेंग शुईला मान्यता मिळाली आहे. फेंग शुईनुसार तुमच्या आसपास ज्या काही वस्तू, वनस्पती, प्राणी किंवा इतर काही गोष्टी असतात त्याचा परिणाम हा तुमच्यावर होत असतो. हा परिणाम सकारात्मक असू शकतो किंवा मग नकारात्मक देखील असू शकतो. जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. मात्र जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, तेव्हा मात्र प्रगतीची दारं तुमच्यासाठी खुली होतात. फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या चुकूनही कोणाला गिफ्टमध्ये देऊ नये. जर तुम्ही या गोष्टी गिफ्टमध्ये दिल्या तर तुमच्या नातेसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

धारदार वस्तू – कोणालाही गिफ्टमध्ये धारदार वस्तू, जसं की चाकू, कात्री, नेलकटर या सारख्या वस्तू देऊ नये, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. फेंग शुईमध्ये अशा वस्तूंना नातेसंबंधात दुरावा निर्माण करणाऱ्या मानलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा अशा वस्तू तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकांना भेट देतात, तेव्हा तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, असं फेग शुईमध्ये म्हंटलं आहे.

रूमाल – फेंग शुई शास्त्रानुसार कोणाला गिफ्टमध्ये कधीही रूमाल देऊ नये, कारण फेंग शुईमध्ये रूमाल हे अश्रू पुसण्याचं साधन मानलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला रूमाल भेट देतात, तेव्हा तुमच्या नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. तसेच एकमेकांबद्दल भविष्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते, असं फेगं शुई मध्ये म्हटलं आहे.

घड्याळ – फेंग शुई आणि चीनी शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीला घड्याळ गिफ्ट देणं हे अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. घड्याळ हे वेळेचं प्रतिक असतं. तुम्ही जेव्हा एखाद्याला घड्याळ भेट देतात, तेव्हा त्या व्यक्तीचा वाईट काळ सूरू होतो, तसेच तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊन भांडणं होऊ शकतात. त्यामुळे कोणालाही घड्याळ गिफ्ट देऊ नये, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

प्लास्टिकच्या वस्तू – फेंग शुई शास्त्रानुसार आजकाल अनेक जण गिफ्ट म्हणून प्लास्टिकच्या आणि अर्टिफिशयल वस्तू देतात. परंतु प्लास्टिकच्या वस्तू या फार काळ टिकत नसतात, त्याचप्रमाणे अशा गिफ्टमुळे तुमचे नातेसंबंध देखील दीर्घकाळ टिकणार नाहीत, म्हणून अशा वस्तू गिफ्टमध्ये देऊ नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us