Feng Shui : घरात ठेवा फक्त या चार मूर्ती, आयुष्यच बदलेल, घर पैशांनी भरून जाईल

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये अशा काही मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. या मूर्तींमुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Feng Shui : घरात ठेवा फक्त या चार मूर्ती, आयुष्यच बदलेल, घर पैशांनी भरून जाईल
feng shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 10:28 PM

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते, काहीही कारण नसताना घरात सतत भांडणं होतात. पैशांसंबंधी समस्या निर्माण होतात. अचानक एखादं मोठं संकट येतं, त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन साधलं जाणं महत्त्वाचं असतं. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवण्यासाठी फेंग शुई शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.  फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही मूर्ती आहेत, ज्या तुम्ही जर तुमच्या घरात ठेवल्या तर त्याचा अत्यंत शुभ प्रभाव तुमच्यावर होतो. तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आज आपण यातीलच काही मूर्तींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

कासवाची मूर्ती – फेंग शुई शास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवणं हे, अत्यंत शुभ मानलं जातं. कासवाला स्थिरता आणि प्रगतीचं प्रतिक मानलं जातं. ज्या घरात कासवाची मूर्ती असते, त्या घरातील सर्वप्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. मात्र घरात कासवाची मूर्ती ठेवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, कासवाचं तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावं.

Loading...

हत्तीची मूर्ती – फेंग शुईमध्ये हत्तीच्या मुर्तीला देखील शुभ माण्यात आलं आहे. हत्तीला समृद्धीचं प्रतिक माण्यात येतं. तसेच ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, अशा घराचं सर्व प्रकाराच्या नकारात्मक शक्तींपासून वाईट शक्तींपासून संरक्षण होतं, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, अशा घरात सुख, समृद्धी आणि शांततात नांदते, असंही फेगं शुईमध्ये म्हटलं आहे.

धावत्या घोड्यांची मूर्ती -फेंग शुई शास्त्रामध्ये धावत्या घोड्याची मूर्ती घरात ठेवणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे.

उगवत्या सूर्याची मूर्ती – फेंग शुई शास्त्रानुसार उगवत्या सूर्याची मूर्ती घरात असणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us