Feng Shui : घरात फक्त हे चार बदल करा, आयुष्यात येईल सुख, समृद्धी अन् शांती, कधीच पैसे कमी पडणार नाहीत
फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरात होऊ नये, यासाठी फेंग शुईमध्ये विविध उपाया सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्रमध्ये सकारात्म ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा महत्त्वाची मानली जाते, त्याचप्रमाणे फेंग शुईमध्ये देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा महत्त्वाची मानली जाते. फेंग शुई शास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध अडचणी येतात. नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे काहीही कारण नसताना घरात अचानक भांडणं होणं, पैशांची अडचण, आरोग्याच्या समस्या सोबतच इतरही काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी फेंग शुईमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
घराचा मुख्य दरवाजा – फेंग शुई शास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा. घराच्या मुख्य दरवाजाच्या आसपास कोणतीही अडचण नसावी कारण घराचा मुख्य दरवाजा हाच ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. येथूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा नेमही स्वच्छ असावा, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.
झाडं- फेंग शुईनुसार जे झाडं पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करतात असे झाडं घरात आवर्जून लावले पाहिजेत. घरामध्ये कधीही काटेरी झाडं लावू नयेत, असं फेंग शुई मध्ये सांगण्यात आलं आहे.
फर्निचर – फेंग शुईनुसार घरातील बेड आणि इतर गोष्टी अशा असाव्यात ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून बरोबर समांतर असाव्यात. यामुळे घरात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते.
सोफा – घरातील सोफा हा अशा ठिकाणी असावा जिथून तुम्हाला तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा सहज दिसावा, परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी की घरातील सोपा हा कधीही घरातील ब्रह्म स्थानावर नसावा. सोफाच काय घरातील ब्रह्म स्थानावर कोणतीही वस्तू नसावी असं, फेंग शुई शास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)