Feng Shui : घराच्या भिंतींवर कधीच लावू नका हे फोटो, आयुष्य उद्ध्वस्त होईल

फेंग शुई हे देखील एक प्रकारचं वास्तुशास्त्रच आहे. फेंग शुईमध्ये काही फोटो, छायाचित्र हे अशुभ माण्यात आले आहेत. असे छायाचित्र किंवा फोटो तुम्ही जर तुमच्या घरात लावले तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यामुळे तुमच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

Feng Shui : घराच्या भिंतींवर कधीच लावू नका हे फोटो, आयुष्य उद्ध्वस्त होईल
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 6:51 PM

घराच्या भिंतींवर आपण विविध प्रकारचे फोटो, छायाचित्र लावतो, असे फोटो लावण्या मागचा उद्देश जरी घराची सजावट करणं असा असला तरी देखील त्या फोटोंचा, छायाचित्रांचा न कळत आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो, असं फेंग शुई शास्त्रामध्ये म्हटलं आहे. फेंग शुई शास्त्रानुसार काही फोटो हे खूप शुभ असतात, जे फोटो बाहेरची सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करतात. त्याचा शुभ प्रभाव हा त्या घरातील व्यक्तींवर होतो. तर दुसरीकडे असे देखील काही छायाचित्र किंवा फोटो असतात, जे घरात लावल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा अशुभ प्रभाव कुटुंबातील व्यक्तींवर होतो. असे फोटो घरात लावल्यामुळे काहीही कारण नसताना अचानक वाद वाढतात. कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नाही. पती-पत्नीचे देखील वाद होतात. तसेच तुमचं सर्व सुरळीत सुरू असताना देखील अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. आज आपण अशाच काही फोटोंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जे फोटो कधीही घराच्या भिंतीवर लावू नये, असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

मावळत्या सूर्याचा फोटो- मावळत्या सूर्याचा फोटो हा दिसायला खूप आकर्षक वाटतो. असं छायाचित्र सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतं, त्यामुळे अनेकजण आपल्या घरात मावळत्या सूर्याचा फोटो लावतात. परंतु फेंग शुईनुसार असा फोटो घरात लावणं हे अशुभ मानलं जातं. कारण अशा फोटोंमुळे तु्मच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याऐवजी घरात उगवत्या सूर्याचा फोटो लावावा, असा सल्ला फेगं शुईमध्ये देण्यात आला आहे. उगवता सूर्य हे प्रगतीचं, आर्थिक स्थैर्याचं प्रतिक मानलं जातं.

Loading...

वाहत्या पाण्याचं छायाचित्र – धार्मिक मान्यतेनुसार घरात कधीही वाहत्या पाण्याचं किंवा उंचावरून पाणी पडणाऱ्या धबधब्याचं चित्र लावू नये, असं मानलं जातं की ज्या प्रमाणे पाणी वाहत आहे, त्याचं प्रमाणे तुमच्या घरातून देखील पैसा वाहतो, अशा छायाचित्रामुळे आर्थिक बरकत येत नाही, हातात पैसा टिकत नाही, असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

काटे असलेल्या वनस्पतीचा फोटो – फेंग शुई शास्त्रानुसार घरात कधीही काटे असलेल्या कोणत्याही वनस्पतीचा फोटो लावू नये, कारण यामुळे तुमच्या घरात गृह कलह वाढण्याची शक्यता असते. कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us